Football  Dainik Gomantak
गोवा

तासा गोवा फुटबॉल स्पर्धा: एफसी गोवाचा दणदणीत विजय

सेझा अकादमीवर चार गोल, कळंगुट असोसिएशनही विजयी

दैनिक गोमन्तक

पणजी: एफसी गोवा संघाने जीएफए 20 वर्षांखालील तासा गोवा फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी सेझा फुटबॉल अकादमीवर 4-0 फरकाने दणदणीत विजय नोंदविला. सामना साल्वादोर द मुंद पंचायत मैदानावर झाला. माल्सॉमत्लुआंगा, व्हर्स्ली पेस, रायन मिनेझिस व डेव्हिस फर्नांडिस यांनी एफसी गोवाच्या विजयात प्रत्येकी एक गोल नोंदविला. त्यांचा हा चार सामन्यातील तिसरा विजय ठरला. पुढील सामना स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाविरुद्ध होईल. (Football Tournament: FC Goa wins by a landslide )

सामन्याच्या 18 व्या मिनिटास माल्सॉमत्लुआंगा याने एफसी गोवाचे गोलखाते उघडले. 39 व्या मिनिटास सेटपिसेसवर एफसी गोवाची आघाडी वाढली. माल्सॉमत्लुआंगा याच्या कॉर्नर किकवर व्हर्स्ली पेस याने गोल केला. नंतर 41 व्या मिनिटास रायन मिनेझिस याने ताकदवान व्हॉली फटक्यावर एफसी गोवाची आघाडी 3-0 अशी भक्कम केली. उत्तरार्धातही एफसी गोवाचे आक्रमण कायम राहिले. ७०व्या मिनिटास मेव्हन डायस याचे हेडिंग थोडक्यात हुकले. 78 व्या मिनिटास डेव्हिस फर्नांडिसच्या प्रेक्षणीय फ्रीकिक फटक्यावर एफसी गोवाची आघाडी 4-0 अशी भक्कम झाली.

कळंगुटची वास्कोवर मात

म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झालेल्या स्पर्धेतील आणखी एका सामन्यात कळंगुट असोसिएशनने वास्को स्पोर्टस क्लबवर 2-1फरकाने मात केली. साईदीप पोंबुर्फेकर याने 11 व्या, तर व्हेरॉन परेरा याने 31 व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे कळंगुटचा संघ विश्रांतीला 2-0 असा आघाडीवर होता. 63 व्या मिनिटास जोशुआ डिसिल्वा याने वास्को पिछाडी एका गोलने कमी केली.

गोवा क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धेत स्टॅमिना क्लबची घोडदौड कायम

गोवा क्रिकेट असोसिएशनच्या ब गट क्रिकेट स्पर्धेत तिसवाडी विभागीय विजेतेपद मिळविलेल्या स्टॅमिना क्रिकेट क्लबची आगेकूच कायम आहे. शुक्रवारी त्यांनी सम्राट स्पोर्टस क्लबला 50 धावांनी हरवून स्पर्धेची उत्तर विभागीय अंतिम फेरी गाठली.

पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर झालेल्या लढतीत अष्टपैलू रुपेश सर्वणकर स्टॅमिना क्लबच्या विजयाचा शिल्पकार ठरला. संघाच्या कर्णधाराने 39 धावा केल्या, तसेच तीन गडीही बाद केले. स्टॅमिना क्लबने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 222 धावा केल्या, नंतर सम्राट क्लबचा डाव 172 धावांत संपुष्टात आला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

Romi Konkani: रोमी कोंकणी, मराठी वादावर दत्ता नायकांचे मोठे विधान! पहा...

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण! देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT