valanka alemao and Caitano Fernandes Dainik Gomantak
गोवा

Goa: महिला फुटबॉलपटूंचा विनयभंग; वालंका आलेमाव यांनी GFA अध्यक्षाविरोधात दाखल केला अब्रुनुकसानीचा खटला

Goa Crime News: वालंका आलेमाव आणि गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष कायतान फर्नांडीस यांच्यात जुंपली आहे.

Pramod Yadav

Goa Crime News

इंडियन वुमन लीग-2 फुटबॉल स्पर्धेतील दोन महिला फुटबॉल खेळाडूंचा विनयभंग करून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा (AIFF) कार्यकारी समिती सदस्य हिमाचल प्रदेशमधील दीपक शर्मा याच्याविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

दरम्यान, याप्रकरणाला आता नवे वळण लागले असून, वालंका आलेमाव आणि गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष कायतान फर्नांडीस यांच्यात जुंपली आहे.

अखिल भारतीय फुटबॉल महासंघ महिला समितीच्या अध्यक्ष वालंका आलेमाव यांनी गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष कायतान फर्नांडीस यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. कायतान यांनी नाहक बदनामी केल्याचा आरोप वालांका यांनी केला आहे.

महिलांचा समावेश असलेल्या संवेदनशील विषयात कायतान फर्नांडीस यांनी राजकारण करु नये, असाही सल्ला वालांका यांनी दिला.

दीपक शर्मा यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करु नये यासाठी वालंका आलेमाव यांनी पीडित फुटबॉल खेळाडुंवर दबाव आणल्याचा आरोप कायतान फर्नांडीस यांनी वालंका यांच्यावर केला होता. यावरुन कायतान यांनी नाहक बदनामी केल्याचा आरोप वालंका यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?

गोव्यात सध्या इंडियन वुमन लीग-२ फुटबॉल स्पर्धेतील सामने सुरु आहेत. या स्पर्धेदरम्यान दोन महिला फुटबॉल खेळाडूंचा विनयभंग करून त्यांना मारहाण केल्याचा आरोप दीपक शर्मा यांच्या विरोधात करण्यात आला. याप्रकरणी म्हापसा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

दरम्यान, म्हापसा पोलिसांनी याप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल करुन दीपक शर्माला अटक केली. याप्रकरणी हिमाचल प्रदेशातील खाड फुटबॉल क्लबची 21 वर्षीय महिला खेळाडू तक्रारदार आहे. तक्रारदाराच्या दाव्यानुसार, संशयिताने हे कृत्य केले, तेव्हा तो दारूच्या नशेत होता, असे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hard Decision! विश्वचषक संघातून शुभमन गिलला डच्चू का? कॅप्टन सूर्याने सांगितलं संघ निवडीमागचं 'ते' मुख्य कारण

Sunburn Festival: 'गोव्याशी तुलना करू शकत नाही...' मुंबईतील पहिल्या सनबर्न फेस्टिव्हलबाबत 'EDM' चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

अक्षय खन्नावर कौतुकाचा वर्षाव, आर. माधवनचा होतोय जळफळाट? म्हणाला, "तो स्वतःमध्येच..."

Imran khan: इम्रान खानचे पाय आणखी खोलात; पत्नी बुशरा बीबीसह 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय

VIDEO: अफलातून कॅच! मार्नस लॅबुशेची हवेत उडी अन् एका हाताने भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT