Goa Congress: केव्हा होणार उमेदवाराची घोषणा? काँग्रेस नेते, कार्यकर्ते संभ्रमात

Goa Congress: प्रचार करण्यासाठी अवघे 35 दिवस मिळणार असल्याने तेवढ्या दिवसात विधानसभेच्या 20 मतदारसंघात प्रचार दौरे करायचे तरी कसे?
Goa Congress Loksabha Candidate
Goa Congress Loksabha CandidateDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress Loksabha Candidate

लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर करण्यास काँग्रेस उशीर लावत असल्याने काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. प्रचार करण्यासाठी अवघे 35 दिवस मिळणार असल्याने तेवढ्या दिवसात विधानसभेच्या 20 मतदारसंघात प्रचार दौरे करायचे तरी कसे ही चिंता काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांना सतावत आहे.

प्रभारीपदाचा ताबा घेतल्यावर काँग्रेस उशीरा उमेदवार जाहीर करण्याची चूक या खेपेला करणार नाही असे सांगणाऱ्या माणिकराव ठाकरे यांच्याकडेही उमेदवार कधी जाहीर होणार याचे उत्तर नाही.

उत्तर गोव्यातून माजी केंद्रीयमंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप, प्रदेश सरचिटणीस विजय भिके यांनी उमदेवारी मिळवण्यास रस दाखवला होता.

दक्षिण गोव्यातून विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्यासह कॅप्टन विरिएतो फर्नाडिस, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे कायम निमंत्रित गिरीश चोडणकर, माजी अधिकारी एल्विस गोम्स यांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली होती.

काँग्रेसने उमेदवारीसाठी अर्ज मागवले तेव्हा तब्बल 16 जणांनी अर्ज सादर केले होते. यावरून कॉंग्रेसच्या उमेदवारीला किती मागणी आहे हे लक्षात येते.

Goa Congress Loksabha Candidate
Delhi Excise Scam: गोवा निवडणुकीत 45 कोटींचा वापर; ईडीच्या दाव्याला आता CBI, IT ची पुष्टी

सुनील कवठणकर यांचे नाव चर्चेत

उत्तर गोव्यातून सुनील कवठणकर यांचे नाव गेले काही दिवस चर्चेत आहे. त्यांचे नाव आपचे राज्य संयोजक अ‍ॅड.अमित पालेकर यांनी सुचवल्याची चर्चा कॉंग्रेसमध्ये आहे.

त्यामुळे कवठणकर यांच्या नावाला कॉंग्रेसमधूनच तशी पसंती नाही तरीही त्यांचे नाव वरिष्ठ पातळीवर विचारात घेतले गेले आहे. दक्षिण गोव्यातून कॅप्टन विरिएतो फर्नांडिस यांच्या नावाची चर्चा असली तरी गिरीश चोडणकर यांना आपल्यालाच उमेदवारी मिळेल असे वाटते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com