Restaurants, residents fined in Margao Dainik Gomantak
गोवा

Margao News : रेस्टॉरंट, गाडेवाल्यांना मडगावात दंड ‘एफडीए’ कडून कारवाईचा बडगा

या पाहणीवेळी काही आस्थापनांनी नियमांचे पालन केल्याचे दिसून आले, अशी माहिती ‘एफडीए’तर्फे प्रसिध्दीपत्रकात देण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News : मडगाव, : अन्न आणि औषध प्रशासन संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी मडगाव शहरात विविध ठिकाणी आस्थापने, रेस्टॉरंट, गाडेवाले अशा नियम न पाळता व्यवसाय करणाऱ्या तसेच अस्वच्छ वातावरणात अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई केली. सुमारे सात आस्थापनांना नियम उल्लंघनाबद्दल दंड ठोठावण्यात आला.

या पाहणीवेळी काही आस्थापनांनी नियमांचे पालन केल्याचे दिसून आले, अशी माहिती ‘एफडीए’तर्फे प्रसिध्दीपत्रकात देण्यात आली आहे.

नावेली येथील मे. रुस्टर (कोस्टल किचन) रेस्टॉरंटची एफडीएच्या अधिकाऱ्यांनी अचानक पाहणी केली. त्यांना नियमांचे पालन न केल्याप्रकरणी ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. यावेळी मडगावातील कदंब बस स्थानकासमोरील खाद्यपदार्थांच्या गाड्यांची पाहणी करण्यात आली.

तेथे स्थानिकांनी नियम उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना दंड ठोठावण्यात आला. मात्र, या परिसरातील इतर चार रेस्टॉरंटची पाहणी करण्यात आली असता त्यांच्याकडून नियमांचे पालन केल्याचे आढळले.

नियमभंग करणे भोवले

भास्कर साहू या व्यावसायिकाला ३ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

अस्वच्छ वातावरणात व्यवसाय केल्याप्रकरणी राम अवध यादव याला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

राकेश मौर्य यांना अस्वच्छतेप्रकरणी पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला.

अस्वच्छतेत रेस्टॉरंट चालविल्याबद्दल लालबहादूर मौर्य यांना ५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला.

मल्लेश नाईक यांना नियमभंगाबद्दल पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

ओमप्रकाश मौर्य आणि पूजन यादव यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

SCROLL FOR NEXT