Illegal Mining in Goa Dainik Gomantak
गोवा

Illegal Mining in Goa: फोंडा पोलिसांची धडक कारवाई! मरड धारबांदोडा येथील बेकायदा चिरेखाणीवर छापा, मजुरांनी काढला पळ

Illegal Mining: मरड-धारबांदोडा येथील बेकायदा चिरेखाणीवर फोंडा पोलिसांनी काल संध्याकाळी छापा टाकून काही यंत्रणा जप्त केली आहे.

Sameer Amunekar

फोंडा: मरड-धारबांदोडा येथील बेकायदा चिरेखाणीवर फोंडा पोलिसांनी काल संध्याकाळी छापा टाकून काही यंत्रणा जप्त केली आहे. पोलिस छापा टाकणार असल्याचा सुगावा लागल्याने येथे काम करणाऱ्या मजुरांनी पळ काढला, त्यामुळे पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

धारबांदोडा तालुक्यात बेकायदा कृत्यांना ऊत आला असून बेकायदा चिरेखाणींचे पेवच फुटले आहे. बेकायदेशीर व्यवसायातून बक्कळ पैसा कमावला जात असल्याने अशी कृत्ये करण्यासाठी लोक धजावत असून सरकारी मालमत्तेचा गैरफायदा घेण्याचा प्रकार होत आहे.

मरड येथे बेकायदा चिरेखाण चालत असल्याचे समजल्यानंतर फोंडा पोलिसांनी या ठिकाणी कारवाईसाठी धाव घेतली, पण प्रत्यक्षात मात्र कुणीच सापडले नाही. चिरे काढण्यासाठी वापरण्यात येणारे पावर टिलर मशीनसह चिरे कापण्यासाठी वापरण्यात येणारे मशीन तसेच चिऱ्यांचा ढिगारा तेथे सापडल्याने पोलिसांनी ते जप्त केले आहे.

चिरे काढण्यासाठी या ठिकाणी बेकायदा झाडांची कत्तल करून उत्खनन करण्यात आले आहे. हा बेकायदेशीर व्यवसाय मागच्या बऱ्याच काळापासून सुरू होता, असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून चिरे काढण्यासठी दोन मीटरपेक्षा जास्त जमीन खोदण्यात आली आहे. आतापर्यंत हजारो चिरे या ठिकाणाहून काढले असावे, असाही कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

माणुसकीला काळिमा! छत्तीसगडमध्ये 19 वर्षीय तरुणीवर 5 जणांचा सामूहिक अत्याचार; पोलीस हेल्पलाइनचा ड्रायव्हरच निघाला नराधम

Viral Video: "मग आम्ही काय पाकिस्तानी आहोत का?", काश्मिरी माणसानं पर्यटकाला दिलं झणझणीत उत्तर; सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

लोकहितासाठी सरकार मागे हटण्यासही तयार! आंदोलकांनी चर्चेसाठी पुढे यावे- श्रीपाद नाईक

Lucky Gemstones: ग्रहांच्या 'बॅटिंग'वर तुम्ही मारणार सिक्सर! कामात फोकस आणि नफ्यात वाढ देणारी 5 लकी रत्ने; करिअरच्या मैदानात आता तुम्हीच ठरणार मॅन ऑफ द मॅच

मोपा विमानतळावर 3.16 कोटींचे अमली पदार्थ जप्त; आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT