Fraud Case Dainik Gomantak
गोवा

Fraud Case: 10 कोटींचे कर्जाचे आमिष महागात पडले! सराफी दुकानदाराला 26 लाखांना गंडा, महाराष्ट्रातील 5 जणांविरोधात तक्रार

Goa Business Loan Scam: व्यवसायवाढीसाठी १० कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील पाच जणांनी फोंड्यातील एका नामांकित सराफी दुकानदाराला तब्बल २६ लाख रुपयांचा गंडा घातला.

गोमंतक ऑनलाईन टीम

फोंडा: व्यवसायवाढीसाठी १० कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील पाच जणांनी फोंड्यातील एका नामांकित सराफी दुकानदाराला तब्बल २६ लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी फोंडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

व्यवसायवाढीसाठी कर्जाची गरज असल्याने संबंधित सराफी दुकानदाराने नवी मुंबई येथील ‘अहिरे इन्फ्रा व्हेंचर्स टेक्नॉलॉजीज’ या आस्थापनाशी संपर्क साधला. त्यानंतर नवी मुंबई येथील श्वेता उंडारे यांनी त्यांची ओळख आपला भाऊ नरेश अहिरे तसेच महाराष्ट्रातील बजरंग मोहिते, सौरभ टिकम आणि निलेश पाटील यांच्याशी करून दिली.

या सर्वांच्या बैठकीनंतर दुकानदाराला १० कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, त्यापूर्वी व्यवसायाची पाहणी करून सर्वेक्षण अहवाल तयार करण्यासाठी दीड लाख रुपये ‘व्हिजिटिंग फी’ म्हणून देण्यास सांगण्यात आले. त्यानुसार दुकानदाराने ‘एनईएफटी’द्वारे संबंधितांच्या खात्यात दीड लाख रुपये वर्ग केले. पैसे मिळाल्यानंतर बजरंग मोहिते, सौरभ टिकम आणि निलेश पाटील हे तिघे फोंड्यात आले.

त्यांनी सराफी दुकानाची पाहणी करून सर्वेक्षण अहवाल तयार केला. त्यानंतर १० कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यासाठी आणखी २५ लाख रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. कर्जाची रक्कम खात्यात जमा झाल्यानंतर हे पैसे परत केले जातील, असे आश्वासन देण्यात आले.

त्यावर विश्वास ठेवून दुकानदाराने श्वेता उंडारे आणि नरेश अहिरे यांच्याकडे २५ लाख रुपये सुपूर्द केले. त्यानंतर दोघांनी दुकानदाराकडून कोरे धनादेश, प्रॉमिसरी नोट्स आणि करारनाम्यावर स्वाक्षऱ्या करून घेतल्या. हा सर्व व्यवहार २८ मार्च ते १० जून या कालावधीत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, एवढी रक्कम देऊनही संबंधितांनी १० कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे दुकानदाराने पैसे तसेच आपली कागदपत्रे परत मागितली असता, संबंधितांनी पैसे परत करण्यास नकार दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT