

म्हापसा: कळंगुट येथे कामासाठी खोदण्यात आलेल्या धोकादायक उघड्या गटारात एक दाम्पत्य दुचाकीसह कोसळून जखमी झाले. सुदैवानेच ते बचावले. दरम्यान, याच परिसरात काही दिवसांपूर्वी उघड्या गटारातील लोखंडी सळई पोटात घुसल्याने मुंबईतील एका पर्यटकाला जीव गमवावा लागला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळातर्फे कळंगुट येथे काम सुरू आहे. मात्र तेथे बॅरिकेड्स लावलेले नाहीत. गटारात कोसळलेल्या दाम्पत्याला स्थानिकांनी तातडीने मदत करून सुरक्षित बाहेर काढले. या प्रकरणी तक्रार न नोंदवता दाम्पत्य तेथून निघून गेले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.