Flower of Life Sand Art on Miramar Beach Dainik Gomantak
गोवा

‘फ्लॉवर ऑफ लाईफ’! 48 तासांच्या मेहनतीने मिरामार किनाऱ्यावर साकारले वाळूशिल्प; सागर मुळेंची कलाकृती

कलाकार सागर नाईक मुळे याने हे वाळूशिल्प साकारले आहे.

दैनिक गोमन्तक

आजपासून गोव्यात G20 बैठकांना सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यात कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गोव्यात होणाऱ्या 8 बैठकांच्या माध्यमातून गोव्याची कला, संस्कृती आणि खाद्यसंस्कृती जगभरात पोहोचवण्याचा सरकारचा मानस आहे.

यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शिखर परिषदेसाठी गोव्यात दाखल होणाऱ्या प्रतिनिधींसाठी खास गोव्यातील प्रसिद्ध खाद्यपदार्थांची मेजवानीही ठेवण्यात आली आहे. याच निमित्ताने मिरामार समुद्रकिनाऱ्यावर उत्कृष्ट वाळू शिल्प पाहण्याची संधी गोवेकरांना प्राप्त झाली. कलाकार सागर नाईक मुळे याने हे वाळूशिल्प साकारले आहे.

‘आपल्या इथल्या अनेक देवळात, वरच्या भागावर एक फुल सदृश्‍य रचना रंगवलेली (किंवा कोरलेली) अनेकदा आपल्याला दिसते. ‘फ्लॉवर ऑफ लाईफ’ म्हणून ओळखली जाणारी ही रचना, मान वर करुन आपल्याला पहावी लागते. नजरेचा कोन बदलून, लोकांनी ती पहावी या इच्छेने मला ती जमीनीवर रचावी असे वाटत होते. जी-20च्या निमित्ताने या, ‘फ्लॉवर ऑफ लाईफ’चे वाळूशिल्प बनवायची संधी मला प्राप्त झाली आणि माझी ती इच्छाही एक प्रकारे पूर्ण झाली याचा मला आनंद वाटतो’, असे चित्रकार सागर नाईक मुळे याने सांगितले.

गेले 48 तास वाळूत काम करुन सागर दमला होता परंतु आपली एक कलाकृती पूर्ण झाल्याच्या समाधानात, त्याच्या बोलण्यातला जोश अजूनही कायम होता. त्याचा एक कलाकार मित्र दीपक गावकर याच्या सहाय्याने त्याने हे भव्य वालुका शिल्प मिरामारच्या किनाऱ्यावर बनवले आहे. या शिल्पाच्या चारही बाजूंनी माडाच्या चुडतांच्या दांड्याचा भाग (ज्याला कोकणीत ‘पिराडे’ म्हटले जाते) गोलाकार मांडून त्याने शिल्पाला एक बंदिस्तपणा दिला आहे. शिल्पाच्या मधल्या भागात मूळ कावी कलेसाठी वापरला जाणाऱ्या चुन्याने, ‘फ्लाॅवर ऑफ लाईफ’चे शक्ती केंद्र तयार केले आहे. अशाप्रकारे स्थानिक नैसर्गिक साधने वापरुन त्याने आपली ही कावी सदृश्य रचना तयार केली आहे.

Flower of Life Sand Art on Miramar Beach

आपला प्रस्ताव घेऊन जेव्हा सागर गोवा प्रशासनातल्या संबंधित अधिकाऱ्यांकडे पोहोचला तेव्हा त्या प्रस्तावाचे त्यांनी लगेच स्वागत केले आणि सागरच्या निर्मितीला पूर्ण सहकार्य करण्याचे ठरवले. त्याचप्रमाणे, गोव्यातील वास्तुरचनाकार सुनील सरदेसाई व महेश नाईक यांचे सहकार्यही सागरला वेळोवेळी मिळाले. त्या दोघांचा ऋणनिर्देश सागर मोठ्या आदराने करतो.

प्रशासनाने सागरला केवळ मिरामार येथेच ‘पब्लीक आर्ट’ निर्माण करण्याची जबाबदारी दिली नाही तर बांबोळी येथील ‘पार्क हयात’मध्ये जी-20 परिषदेसाठी जमणाऱ्या परदेशी प्रतिनिधींसमोर कावी कलेचे प्रात्यक्षिक देण्याची जबाबदारी देखील सोपवली. त्यानुसार, आजपासून ‘पार्क हयात’मध्ये, खास उभारलेल्या स्टॉलवर तो कावी कलेचे प्रात्यक्षिक सादर करणार आहे. कावी कलेत त्याने केलेल्या प्रयोगांची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सागरचा उल्लेख आपल्या ‘मन की बात’ मध्ये केला होता.

...विचार पक्का झाला

या वालुका शिल्पाबद्दल सांगताना सागर सांगतो, ‘जेव्हा जी-20 परिषद भारतात होणार हे मला कळले तेव्हांच माझ्या मनात या परिषदेनिमित्ताने काहीतरी कलात्मक करावे असा विचार आला आणि परिषदेचा एक भाग गोव्यात होणार आहे हे कळताच तो विचार पक्का झाला.’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

"... म्हणून मी मांसाहार सोडला", आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा भावनिक खुलासा; Watch Video

Goa Politics: मंत्रीपद देतो म्हटलं की धावत येतील, विरोधकांच्या एकीचा उपयोग होणार नाही, 2027 मध्ये गोव्यात भाजपचीच सत्ता; विश्वजीत राणे

Cricket Controversy: "आपसी रंजिश, गुस्सा और खराब भाषा..." ज्युनियर्सवर हल्ल्याच्या आरोपानंतर बांगलादेशी कर्णधाराचा मोठा खुलासा, पोस्ट करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT