Bicholim News : कुडचिरेतील तळ्याचे भाग्य उजळले! नैसर्गिक झरे प्रवाहित

प्रचंड जलसाठा उपलब्‍ध; धरण बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन
bicholim kudchire lake
bicholim kudchire lakeDainik Gomantak

गेल्या काही वर्षांपासून विस्मृतीत गेलेल्या आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या डिचोली तालुक्यातील कुडचिरे येथील पुरातन तळ्याचे आता भाग्य उजळले आहे. या तळ्यातील गाळ उपसताच नैसर्गिक झरे प्रवाहित झाले असून, या तळ्यात आता प्रचंड प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाला आहे.

जलसंसाधन खात्यातर्फे या तळ्यातील गाळ उपसण्याचे काम हाती घेण्यात आले असून, अर्धाअधिक गाळ उपसताच तळे जलमय झाले आहे. दरम्यान, या तळ्याचे मिनी धरणात रूपांतर करण्याचा विचार आता पुढे आला असून, आमदार प्रेमेंद्र शेट यांच्याकडून तसे संकेतही मिळाले आहेत.

मये मतदारसंघातील वन-म्हावळिंगे पंचायत क्षेत्रातील कुडचिरे गावात पुरातन असे नैसर्गिक तळे आहे. एक काळ असा होता की, या तळ्यात बारामाही प्रचंड प्रमाणात जलसाठा उपलब्ध असायचा. याच तळ्यातील पाण्यावर कुडचिरेतील शेतकरी शेती आणि बागायती पीक घेत होते.

bicholim kudchire lake
Pernem News : पेडण्यात पाणीटंचाई; ‘साबांखा’त कर्मचाऱ्यांची कमतरता

मात्र या तळ्याची सुधारणा आणि देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने हळूहळू तळ्‍यात गाळ साचून बुजत गेले. गेल्या दहा-बारा वर्षांपासून तळे पूर्णपणे कोरडे पडले होते.

भटवाडी परिसरात आणि मोठा आवाका असलेले हे तळे पूर्ण कोरडे पडल्याने त्याठिकाणी तळे आहे याची जाणीवही होत नव्हती. तळे कोरडे पडल्याने कुडचिरे गावातील शेती धोक्यात आली. एकेकाळी याच तळ्यातील पाण्यावर गावातील जवळपास दीडशे शेतकरी शेती फुलवत होते.

मात्र हे तळे कोरडे पडल्यापासून शेती करण्यात अडथळा निर्माण झाला. पाण्याअभावी गेल्या जवळपास बारा वर्षांपासून गावातील भटवाडी परिसरातील शेकडो हेक्टर शेती पडीक पडली आहे. दुसऱ्या बाजूने गावातील विहिरींवरही परिणाम जाणवत आहे.

bicholim kudchire lake
Goa Accident News : चालकाचे नियंत्रण सुटले अन् लोखंडी सामाने भरलेली लॉरी उलटली

आमदार प्रेमेंद्र शेट यांच्‍या प्रयत्नांना आले यश

भटवाडी येथे असलेल्या या तळ्याचे अस्तित्व राखून ठेवण्यासाठी तसेच गावातील शेती व्यवसायाला पुनर्जिवीतावस्था प्राप्त करून देण्यासाठी या तळ्याचा विकास करावा अशी मागणी गावातील शेतकऱ्यांकडून होत होती. त्‍यानुसार आमदार प्रेमेंद्र शेट यांनी या तळ्याला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

गेल्या जानेवारी महिन्यात आमदार शेट यांनी या तळ्याची पाहणीही केली. नंतर या तळ्यातील गाळ उपसण्याच्या कामाला सुरूवात झाली. त्‍यामुळे या तळ्‍याला आता चांगले दिवस येणार आहेत.

तेव्हापासून झाली तळ्याची दुर्दशा

भटवाडी येथील या तळ्यातील पाणी पंपाद्वारे शेजारील आणि सत्तरी तालुक्यात येणाऱ्या पडोसेपर्यंत नेण्यात येत होते. त्यामुळे या तळ्यातील जलसाठा सुरक्षित रहावा म्हणून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जलस्रोत खात्यातर्फे उपाययोजना करण्यात येत होती.

मात्र पडोसेपर्यंत पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर या तळ्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले. हळूहळू तळ्याच्या कडा कोसळून त्याची दुर्दशा होत गेली.

"नैसर्गिक वरदान लाभलेल्या कुडचिरेतील तळ्याला पुनर्वैभव प्राप्त करून देणार आहे. त्‍यामुळे या भागातील पाण्याची समस्या मिटणार आहे. झऱ्यांचा स्रोत पाहता या तळ्याचे धरणात रूपांतर करण्यास वाव आहे. त्यादृष्टीने विचार सुरू असून अभ्यास करून निर्णय घेण्यात येणार आहे."

- प्रेमेंद्र शेट, आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com