Bicholim  Dainik Gomantak
गोवा

Bicholim Rain: डिचोलीसाठी मास्टरप्लान तयार; पूर येऊ नये म्हणून या उपाययोजना राबवणार

Bicholim Municipal Council कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली; प्रस्ताव जलस्रोत खात्याला सादर करण्यात येणार

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Flood

डिचोली: डिचोली शहरावरील संभाव्य पुराचे संकट टाळण्यासाठी पूरप्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात येणार आहे. तसा निर्णय आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी झालेल्या पालिका मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

भविष्यात डिचोलीत पुराचे संकट कोसळता कामा नये. त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसा प्रस्ताव जलस्रोत खात्याला सादर करण्यात येणार आहे.

या बैठकीस नगराध्यक्ष कुंदन फळारी, उपनगराध्यक्ष दीपा पळ, नगरसेवक रियाज बेग, नीलेश टोपले, सुदन गोवेकर, अनिकेत चणेकर, विजयकुमार नाटेकर, गुंजन कोरगावकर, ॲड. अपर्णा फोगेरी, ॲड. रंजना वायंगणकर यांच्यासह जलस्रोत खात्याचे कार्यकारी अभियंता के.पी. नाईक, पालिकेचे अधिकारी, माजी नगरसेवक कमलाकर तेली, बाबूराव नाईक आदी उपस्थित होते.

पुराचा धोका टाळण्यासाठी कुडचिरे ते सारमानसपर्यंत डिचोलीतून वाहणाऱ्या नदीतील गाळ काढणे, आवश्यक त्या ठिकाणी नदीकाठी संरक्षक भिंत उभारणे, पंपिंग स्टेशनमध्ये ज्यादा शक्तीचे पंप बसविणे, आदी उपाययोजना करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. पूर प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात आराखडा तयार करून तो सरकारला सादर करण्याचे ठरविण्यात आले. याकामात पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका जलस्रोत खात्याने घेतली आहे.

दोनवेळा पुराचा वेढा

गेल्या जवळपास वीस वर्षांत डिचोलीत पूरसदृश स्थिती निर्माण झाली नव्हती. मात्र, मागील जुलै महिन्यात सतत पडलेल्या मुसळधार पावसामुळे बावीस दिवसांच्या आत तर दोनवेळा शहरासह डिचोली बाजारपेठेला पुराने वेढा दीला होता. पुराने वेढा दिल्यानंतर शहरवासीयांसह व्यापाऱ्यांवर मोठा आकांत कोसळला होता.

दोन्हीवेळा छत्रपती शिवाजी महाराज सर्कलजवळील ‘आर्क’मधून पाणी बाहेर फुटून ते शहरात घुसले होते. पावसाच्या तडाख्याबरोबर डिचोली शहराला टेकून असलेल्या खाण खंदकातून पाणी सोडल्याने शहरात पाणी घुसले. हे एक प्रमुख कारण असले, तरी नदीतील गाळ उपसण्यास झालेले दुर्लक्ष हेही पूरसदृश स्थिती उद्भवण्यामागील एक कारण असल्याचे समोर आले आहे.

कारणे शोधून आराखडा बनवा

यंदाच्या पावसात डिचोली शहरावर दोनवेळा पुराचे संकट आले होते, तरी भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी या पुरामागील नेमकी कारणे शोधून काढावीत. त्यानुसार आराखडा तयार करावा, असे निर्देश आमदार डॉ. शेट्ये यांनी जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले. जमीन संपादन करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार डॉ. शेट्ये यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: 'बर्च' दुर्घटना, पाचही संशयित 14 दिवस न्यायालयीन कोठडीत!

IND VS SA: धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द, चाहत्याचं भंगलं स्वप्न; BCCIवर संताप

Hitler DNA Analysis: गंभीर लैंगिक आणि मानसिक आजाराचा सामना करत होता 'हिटलर'; DNA चाचणीतून झाला खळबळजनक खुलासा

चित्रपट हिट, रेहमानचा डान्स सुपरहिट, पण अक्षय खन्ना म्हणतो 'फरक पडत नाही'; धुरंधरच्या यशावर दिलं 3 शब्दांत उत्तर!

IND vs SA 5th T20: मालिकेचा फैसला अहमदाबादमध्ये! पाचव्या टी-20 सामन्यावर हवामानाचं सावट की पावसाची खेळी? जाणून घ्या खेळपट्टी आणि वेदर रिपोर्ट

SCROLL FOR NEXT