Bicholim: एकीकडे उघडे गटार, दुसरीकडे पथदिव्यांअभावी अंधार; डिचोलीत वाहनचालकांसाठी अडथळ्यांची शर्यत

Bicholim Drainage Issue: या गटारांवर त्वरित लाद्या बसवाव्यात, अशी वाहनचालक तसेच पादचाऱ्यांकडून मागणी होत आहे
Bicholim Drainage Issue: या गटारांवर त्वरित लाद्या बसवाव्यात, अशी वाहनचालक तसेच पादचाऱ्यांकडून मागणी होत आहे
Bicholim Open drainDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: शहरातील जुन्या बसस्थानकाजवळील उघड्या गटारांमुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला असून, हे गटार अपघातांना आमंत्रण ठरत आहेत. या गटारांवर त्वरित लाद्या बसवाव्यात, अशी वाहनचालक तसेच पादचाऱ्यांकडून मागणी होत आहे.

गेल्या जुलै महिन्यात या बसस्थानकावरील जुनाट अवाढव्य झाड कोसळल्यानंतर बसस्थानकाजवळील रस्त्याच्या बाजूच्या गटाराची मोडतोड झाली आहे. गटारावरील लाद्या फुटल्याने सध्या साधारण तीन मीटर लांबीचे गटार उघडे पडले आहे. या गटारामुळे लहानसहान अपघात घडत आहेत. या गटारावर लाद्या बसविण्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

बसस्थानकावरील झाड कोसळले त्यावेळी गटाराजवळील वीजखांब मोडला होता. याठिकाणी नवीन वीजखांब उभारण्यात आला असला, तरी या खांबावर अद्याप पथदीप बसविण्यात आलेला नाही.

Bicholim Drainage Issue: या गटारांवर त्वरित लाद्या बसवाव्यात, अशी वाहनचालक तसेच पादचाऱ्यांकडून मागणी होत आहे
Bicholim Traffic Signal: डिचोलीत ‘सिग्नल यंत्रणा’ पंधरा दिवसांपासून बंद; वाहतुकीचे तीनतेरा

त्यामुळे रात्रीच्यावेळी याठिकाणी अंधार पसरलेला असतो. एकाबाजूने उघडे गटार तर दुसऱ्याबाजूने रात्रीच्यावेळी काळोख यामुळे मोठी समस्या निर्माण होत आहे. उघड्या गटाराचा अंदाज येत नसल्याने अधूनमधून वाहने सरळ गटारात जाऊन अडकून पडतात. वीज खांबावर पथदीप बसवावा, अशीही वाहनचालकांची मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com