Video
Video  Dainik Gomantak
गोवा

Watch Video: जेव्हा हवाईसुंदरी म्हणते, 'आमच्या गोंयांत तुमकां येवकार' पाहा अभिमानास्पद व्हिडिओ

Pramod Yadav

गोव्यात दोन विमानतळ कार्यरत आहेत, नव्याने सुरू मोपा विमानतळवर देखील विमानाची उड्डाणे सुरू झाली आहेत. दरम्यान, अहमदाबाद येथून गोव्यात (Ahmedabad-Goa Flight) येणाऱ्या विमानात संपूर्ण गोवेकरांसाठी अभिमानास्पद घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ स्वत: विजय सरदेसाई (Vijai Sardesai) यांनी ट्विट केला असून, सध्या तो प्रचंड व्हायरल होत आहे.

अहमदाबाद येथून गोव्यात येणारे विमान विमानतळावर उतरण्यापूर्वी हवाईसुंदरी विमान उतरण्याची सूचना कोंकणी भाषेत करते.

"आमी गोंयांत पावलीं, आमच्या गोंयांत तुमकां येवकार, देव बरें करूं." अशी सूचना हवाईसुंदरी करते.

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. "आपण कोण आहोत त्याचा अभिमान बाळगू या! काल माझ्या विनंतीवरून अहमदाबाद-गोवा फ्लाईटमध्ये कोंकणीत सूचना करण्यात आली. कोंकणी भाषेतच सूचना सर्व फ्लाईट् मध्ये बंधनकारक करायला हवी. तसेच, दोन्ही विमानतळावरील LED बोर्ड देखील कोंकणीत लावयला हवेत," असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सरदेसाई यांच्या ट्विटला इंडिगो एअरलाईन्सने उत्तर दिले आहे. "श्री सरदेसाई, आमची टीम तुमच्या भाषेत बोलू शकली हे जाणून आम्हाला आनंद झाला. पुढे, आम्ही शक्य तितक्या सर्व प्रादेशिक फ्लाइटमध्ये स्थानिक भाषा बोलणार्‍या क्रूला सामावून घेण्याचा प्रयत्न करू." असे इंडिगोने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : दोन्‍ही जागा ‘इंडिया’च जिंकणार! विरियातो फर्नांडिस

Siolim News : देशाच्या अधोगतीस काँग्रेस जबाबदार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Israel Hamas War: इस्रायलचा गाझावर पुन्हा हवाई हल्ला, अनेक घरांवर डागली क्षेपणास्त्रे; लहान मुलांसह 13 जणांचा मृत्यू

Goa News : राज्यात ७० टक्क्यांहून अधिक मतदान अपेक्षित! सदानंद शेट तानावडे

Crime News : काणकोणात बारचालकाचा संशयास्पद मृत्यू; मृतदेहाजवळ गावठी बॉम्ब, काडतुसेही सापडल्याने तर्कवितर्क

SCROLL FOR NEXT