Smart City Road  Dainik Gomantak
गोवा

Panjim Smart City: ‘स्मार्ट सिटी’च्या कामांत त्रुटी; गोवा खंडपीठाकडून नाराजी!

Panaji Smart City: सुरू असलेल्या विविध कामांबाबतचा अहवाल सादर करण्यासाठी सरकारने मुदत मागितल्याने त्यावरील सुनावणी ठेवली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राजधानी पणजीत स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांबाबतचा अहवाल सादर करण्यासाठी सरकारने मुदत मागितल्याने त्यावरील सुनावणी पुढील मंगळवारी (६ ऑगस्ट) ठेवली आहे. या कामांमध्ये अनेक त्रुटी असल्याने व कामही पूर्ण झाले नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने नाराजी व्यक्त केली.

‘स्मार्ट सिटी’ योजनेंतर्गत सुरू असलेले काम अजूनही पूर्ण झालेले नाही व त्यात असलेल्या त्रुटींची माहिती देणारी काही छायाचित्रे आज याचिकादाराने गोवा खंडपीठासमोर सादर केली. त्यामध्ये तयार केलेल्या सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर पडलेले खड्डे तसेच पदपथाच्या बाजूने अपूर्ण असलेली कामे याचा त्यात समावेश होता.

रस्ते वाहतुकीसाठी खुले केले असले तरी पादचाऱ्यांसाठी असलेल्या पदपथांची कामे अजूनही अपूर्ण आहेत. हे काम बरेच संथगतीने सुरू आहे. या कामांवर देखरेखीसाठी कोणीही अधिकारी नसल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

‘स्मार्ट सिटी’च्या कामाबाबत याचिका सादर झाल्यावर गोवा खंडपीठाने या कामाची प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली होती व त्याची गंभीर दखल घेतली होती.

त्यावेली नोडल अधिकारी संजीत रॉड्रिग्ज यांनी हे काम मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल, अशी हमी खंडपीठाला दिली होती. जरी रस्ते जूनमध्ये वाहतुकीसाठी खुले केले असले तरी पदपथच नसल्याने वाहने रस्त्यावरच पार्क केल्याने समस्या निर्माण झाली आहे.

पावसाचा अडसर; सरकारचे मत

राज्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे कामांमध्ये अडथळा आला. रस्त्यावर जे खड्डे पडले आहेत ते संततधार पावसामुळे झाले आहेत. पाऊस काही प्रमाणात ओसरल्यानंतर त्या खड्ड्यांची दुरुस्ती केली जाईल, अशी बाजू सरकारतर्फे मांडण्यात आली. मागील सुनावणीवेळी गोवा खंडपीठाने कामाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यावेळीही याचिकादाकराने निकृष्ट काम झाल्याचे निदर्शनास आणून दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला दिवसाढवळ्या लुबाडले, लंपास केली सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

SCROLL FOR NEXT