Flag in ceremony of INVS Tarini in Goa Dainik Gomantak
गोवा

INSV Tarini Returns: 'तारिणी'ची घरवापसी! 7 महिने, 6 जणांचा क्रू, 31 हजार किलोमीटर समुद्री प्रवासाचा थरार..

सहा जणांच्या क्रुमध्ये दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेश

Akshay Nirmale

INSV Tarini Returns in Goa: भारतीय नौदलाची सागरी नौका INSV तारिणी ची गोव्यात घरवापसी झाली आहे. गोव्यात बनलेल्या आणि सात महिन्यांपुर्वी सागर सफरीवर गेलेल्या या नौकेने या सात महिन्यांमध्ये तब्बल 17,000 नॉटिकल मैलांचा (सुमारे 31 हजार 484 किलोमीटर) खडतर प्रवास केला आहे. मंगळवारी INSV तारिणी गोव्यातील होम पोर्टवर परतली.

(Flag in ceremony of INVS Tarini in Goa)

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल हरी कुमार, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत या नौकेचा फ्लॅग इन सोहळा पार पडला. या मान्यवरांच्या उपस्थितीत या नौकेचे स्वागत झाले.

या नौकेवरील कॅप्टन अतुल सिन्हा, लेफ्टनंट कमांडर आशुतोष शर्मा, ले. क. कमांडर निखिल हेगडे, लेफ्टनंट कमांडर दिलना के., लेफ्टनंट कमांडर रूपा ए. कमांडर दिव्या पुरोहित, कमांडर झुल्फिकार यांचे अभिनंदन करून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले.

गोव्यातील दिवार येथे नौदलाच्या अॅक्वारिस शिपयार्ड येथे या नौकेचे बांधणी झाली आहे. या बोटीवर सहा नौदल अधिकाऱ्यांचा ताफा होता. दरम्यान, नौदल आता या नौकेवरून एका महिला अधिकाऱ्याला जगभ्रमंती मोहिमेवर पाठवण्याची तयारी करत आहे.

त्या तयारीचा एक भाग म्हणून गतवर्षी 20 ऑगस्टपासून या नौकेतून दोन महिला अधिकाऱ्यांनी इतर चार अधिकाऱ्यांच्या फिरत्या क्रूसह अंतर-महासागर आंतरखंडीय प्रवास केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT