vasco
vasco Gomantak Digital Team
गोवा

Vasco : अपररॅम्प उभारण्यासाठी पत्रे लावून एफएल गोम्स मार्ग वाहतुकीसाठी बंद

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को : मुरगाव पत्तन प्राधिकरण (एमपीए), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, गॅमन इंडिया व राज्य सरकारतर्फे अखेर वास्को येथील एफएल गोम्स मार्ग उतार (अपररॅम्प) करण्यासाठी बंद करण्यात आला. यामुळे बिगर सरकारी संस्थांसह माजी नगराध्यक्ष, समाज कार्यकर्त्यांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.

रस्ता बंद केल्याने वास्को शहरात मुरगाव बायणातून येणाऱ्या वाहतुकीला मोठी अडचण होणार आहे. तसेच बोगदा, रुमडावाडा, जेटी, सडा व देस्तेरो, बायणातून येणाऱ्या पादचाऱ्यांना एफएल गोम्स मार्ग बंद केल्याने त्रास सहन करावा लागेल. अपररॅम्पच्या पाहणीवेळी दक्षिण गोव्याचे तत्कालीन वाहतूक पोलिस उपअधीक्षक धर्मेश आंगले यांनी अपररॅम्पला परवानगी नाकारून संबंधित कागदपत्रावर शेरा मारला होता. तरीही कंत्राटदार कोणत्या आधारे काम करत आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

सर्व्हिस रस्ता कशासाठी?

वास्को व मुरगाववासीयांना पुर्वसूचना न देता एफएल गोम्स मार्ग वाहतुकीस बंद केला. प्रस्तावित अपररॅम्प याच मार्गावर का करण्यात येत आहे, यांचे स्पष्टीकरण आजपर्यंत जनतेला दिले गेले नाही. एफएल गोम्स रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून सूचित नसताना याठिकाणी सर्व्हिस रस्ता का उभारण्यात येत आहे, याचेही स्पष्टीकरण संबंधित विभागाने न दिल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

समाज कार्यकर्त्यांचा विरोध

मुरगावाला वास्को शहराला जोडणारा मुख्य रस्ता म्हणजे एफएल गोम्स मार्ग. हा रस्ता पुढील एक वर्ष बंद ठेवल्यास सडा, बोगदा, जेटी, बायणा, देस्तेरो व इतर परिसरातील वाहन चालक, पादचाऱ्यांना त्रास होणार आहे. अंदाजे १७ मीटर रुंद असलेल्या या मार्गावर अपररॅम्प उभारल्यास, रस्त्याची रुंदी फक्त ६ ते ७ मीटर वाहतुकीसाठी शिल्लक राहणार आहे. भविष्यातील अडचणी पाहता समाज कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी या अपररॅम्पला विरोध केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

Kala Academy Viral Video: मंत्र्यांसारखे कला अकादमीचे लाईट्स रंग बदलतात; राजदीपचा मुख्यमंत्र्यांना इशारा

SCROLL FOR NEXT