Usgao Crime Dainik Gomantak
गोवा

Usgao Crime: ''त्या दोघांनी माझ्या मुलीला बुडवून मारले...''; उसगांवातील मृत मुलीच्या आईचा आक्रोश

Usgao Tisk Murder: राज्यात सध्या गेल्या दोन दिवसांपासून उसगांवातून बेपत्ता झालेल्या चिमुकलीचे प्रकरण चांगलेच गाजत आहे.

Manish Jadhav

Five Year Old Girl Murdered In Usgao Tisk mother seeks justice

उसगांव: राज्यात सध्या गेल्या दोन दिवसांपासून उसगांवातून बेपत्ता झालेल्या चिमुकलीचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. घरापासून 50 मीटरच्या अंतरावर राहणाऱ्या महाराष्ट्रातील मिरज येथील दाम्पत्याने तिचे अपहरण करुन खून केला. उसगाव येथून गुरुवारी (6 मार्च) जशी ही धक्कादायक घटना समोर आली तशी जनमानसात संतापाची लाट उसळली. यातच आता, मृत चिमुकलीच्या आईची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्या नराधमांनी माझ्या मुलीला पाण्यात बुडवून मारले अशी प्रतिक्रिया आईने दिली.

मृत चिमुकलीची आई काय म्हणाली?

गेल्या दोन दिवसांपासून उसगांवात चिमुकलीच्या अपहरण आणि खून प्रकरणाने वातावरण तापले असताना मृत मुलीच्या आईची (Mother) समोर आलेली प्रतिक्रिया अगदी बोलकी आहे. आरोपी पप्पू आणि पूजा यांंनी माझ्या मुलीला पाण्यात बुडवून मारले. त्या दोघांना कठोरतील कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मृत मुलीच्या आईने यावेळी केली.

आरोपींनी चिमुकलीला शोधण्याचे ढोंग केले

दरम्यान, गुरुवारी सांयकाळी पोलिस पुन्हा चौकशी आले असता पप्पू आणि पूजा संशयास्पद वागू लागले. मात्र पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा मान्य केला. विशेष म्हणजे, बुधवारी या दोघांनी मृत चिमुकलीला शोधण्याचे नाटक केले.

पीडितेचे पप्‍पूच्‍या घरी येणे-जाणे असायचे

पीडिता आपली आई आणि एका भावंडासह कसलये येथे राहत होती. पीडितेच्या आईला लग्न करुन रत्नागिरीला दिली होती, पण नवरा मारझोड करत असल्याने ती दोन्ही मुलांसमवेत कसलये येथे आपल्या आईच्या घरी वर्षभरापूर्वी राहायला आली होती. पीडिता ही अधूनमधून शेजारी राहणाऱ्या पप्‍पू ऊर्फ बाबासाहेब अलाट याच्या घरी जायची. त्यामुळे दोन्ही कुटुंबात चांगले संबंध होते. मात्र या संबंधांचा वापर पप्‍पूने वाईट आणि एकदम खालच्‍या दर्जाच्‍या कामासाठी केला.

घरात 20 वर्षे पाळणा हलला नव्‍हता

पप्‍पू ऊर्फ बाबासाहेब हा एक वेल्डर म्हणून काम करत होता. कसलये येथे राहण्यापूर्वी तो धारबांदोडा संजीवनी साखर कारखान्याजवळ राहत होता. लग्नाला 20 वर्षे उलटली तरी त्‍याच्‍या घरात पाळणा हलला नव्‍हता. त्यामुळे त्याने आपल्‍याला जादूटोण्याने मूल व्हावे आणि घरात समृद्धी यावी यासाठी हे अघोरी कृत्य केले असावे असा कयास व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस त्या दृष्टीने चौकशी करत आहेत.

पोलिस तपास

पोलिस निरीक्षक विजयनाथ कवळेकर आणि उपअधीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. पोलिस अधीक्षक टिकम सिंग यांनीही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT