Goa: हळदोणेत चार वर्षांत पाच सरपंच! Dainik Gomantak
गोवा

Goa: हळदोणेत चार वर्षांत पाच सरपंच!

जून 2017 मध्ये पंचायत निवडणुका झाल्या नंतरच्या या चार वर्षांच्या काळात अलीकडेच पाचव्या सरपंचाची निवड झाली होती.

दैनिक गोमन्तक

म्हापसा: हळदोणे (Aldona) उपसरपंचपदी तेजा वायंगणकर यांची दोन दिवसांपूर्वी बिनविरोध निवड झाली आहे. आमदार ग्लेन टिकलो व माजी आमदार किरण कांदोळकर यांच्यातील राजकीय द्वंद्वामुळे तसेच बहुतांश पंचसदस्यांना सरपंच अथवा उपसरपंचपदावर स्वत: विराजमान व्हावेसे वाटत असल्याने या पंचायत मंडळाला अस्थिरतेने ग्रासलेले आहे असे जाणवते. (Five sarpanches in four years at Aldona village in Goa)

जून 2017 मध्ये पंचायत निवडणुका झाल्या नंतरच्या या चार वर्षांच्या काळात अलीकडेच पाचव्या सरपंचाची निवड झाली होती. आता विद्यमान पंचायत कार्यकाळातील वायंगणकर या चौथ्या उपसरपंच ठरल्या आहेत. उपसरपंच शुक्रदिनी पोळे यांच्या विरोधात १२ जुलै रोजी अविश्वास ठराव संमत झाल्यापासून ते पद रिक्त होते.

नवीन उपसरपंचाची निवड करण्यासाठी पंचायत कार्यालयात घेतलेल्या विशेष सभेस निरीक्षक म्हणून बार्देश गट विकास कार्यालयातील विस्तार अधिकारी मनोहर परवार तसेच पंचायत सचिव उपस्थित होते. बैठकीला सरपंच प्रणेश नाईक. तेजा वायंगणकर, सुभाष राऊत, फ्रांसिस डिसोझा, गजानन हळदणकर, स्मिता मयेकर, थॉमस तावारीस, शुक्रदिनी पोळे, दीपक नाईक, प्रियंका पिंटो उपस्थित होत्या. डेविड फर्नांडिस हे एकमेव पंचायतसदस्य अनुपस्थित होते.

बिनविरोध निवड

बैठकीत उपसरपंच पदासाठी दोन अर्ज आले होते. तेजा वायंगणकर यांचे नाव गजानन हळदणकर यांनी सुचवले. त्या अर्जाला थॉमस तावारीस यांनी अनुमोदन दिलेे. दुसरा अर्ज माजी उपसरपंच शुक्रदिनी पोळे यांचा होता. त्यांचे नाव दीपक नाईक यांनी सुचवले होते, तर प्रियंका पिंटो यांनी अनुमोदन दिले होते. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत पोळे यांनी नामांकन मागे घेतले. निवडणूक अधिकारी परवार यांनी वायंगणकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT