Goa Court Dainik Gomantak
गोवा

Zuari Agro Explosion: झुआरी स्फोट प्रकरणातील 5 अधिकाऱ्यांना गोवा खंडपीठाचा दिलासा; इतर संशयितांविरुद्ध खटला राहणार सुरू

Zuari Agro Chemicals Explosion: झुआरी ॲग्रो केमिकल्स लि.मध्ये अमोनिया टाकीच्या दुरुस्तीचे काम करताना स्फोट होऊन तीन मजुरांचा मृत्यू झाला होता. पाच अधिकाऱ्यांसह कंपनीच्या व्यवस्थापनाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Zuari Agro Chemicals Explosion Five officials acquitted

पणजी: झुआरी ॲग्रो केमिकल्स लि.मध्ये अमोनिया टाकीच्या दुरुस्तीचे काम करताना स्फोट होऊन तीन मजुरांचा मृत्यू झाला होता. पाच अधिकाऱ्यांसह कंपनीच्या व्यवस्थापनाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपांना आव्हान दिलेल्या पाच अधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलासा देत आरोपमुक्त केले आहे.

अमोनिया टाकीच्या दुरुस्तीचे काम कंत्राटदाराला दिलेले तरी त्यावर देखरेख ठेवण्याचे काम अधिकाऱ्यांचे होते. या स्फोटात कर्मचारी गोविंद लोटलीकर, दीपक उसगावकर रोहित शिरते, साईश बिचोलकर व महेश प्रभुदेसाई यांच्याविरुद्ध निष्काळजीपणाचा ठपका ठेवला होता.

इतर संशयितांविरुद्ध खटला सुरू राहणार

हा स्फोट त्यांच्याकडून देखरेख ठेवण्यास झालेल्या निष्काळजीपणामुळे झाला हे कोठेच सिद्ध होत नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध सादर करण्यात आलेले सदोष मनुष्यवधाचे आरोप रद्द करण्यात येत असल्याचे आदेशात न्यायालयाने म्हटले आहे. मात्र या घटनेतील इतर संशयितांविरुद्ध खटला सुरू राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

संघातून बाहेर काढलं, तरी हार मानली नाही! जिद्द, मेहनतीच्या जोरावर जॅक कॅलिस बनला क्रिकेटविश्वातील महान अष्टपैलू; ठोकल्या 25,000हून अधिक धावा, घेतल्या 577 विकेट्स

Student Financial Assistance: गोमंतकीय विद्यार्थ्यांना सरकारची मोठी भेट! IIT, IIM, AIIMSमध्ये प्रवेश मिळाल्यास 1 लाखांची शिष्यवृत्ती

Rashi Parivartan Yog 2026: धनलाभ अन् प्रगतीचा योग! 'राशिपरिवर्तन योगा'ने 5 राशींच्या लोकांचे स्वप्न होणार पूर्ण; रातोरात चमकणार नशीब

Singer Death: मनोरंजन विश्वात खळबळ! रॉक संगीताचा दिग्गज काळाच्या पडद्याआड; फरहान अख्तर, विशाल ददलानी भावुक

SCROLL FOR NEXT