Misconceptions About Goa Dainik Gomantak
गोवा

Misconceptions About Goa: गोवाबद्दलचे पाच गैरसमज, ज्यासाठी कारणीभूत आहेत चित्रपट

गोवा नेमका कसा आहे, तुमच्या मनातही या राज्याबद्दल अनेक गैरसमज आहेत? मग हा लेख तुम्हाला वाचायलाच हवा

गोमन्तक डिजिटल टीम

Misconceptions About Goa: गोवा म्हटले की प्रत्येकाच्या मनात आजवर चित्रपट, मालिका किंवा टीव्ही शोच्या माध्यमातून दाखवलेली प्रतिमा समोर उभी राहते. किंवा जवळचा कोणीतरी नातेवाईक अथवा मित्र केव्हातरी गोव्याला जाऊन आलेले असतात, त्यांनी व्यक्त केलेली मते यावर बऱ्याचवेळा या राज्याबद्दल एक अंदाज बांधला जातो.

पण गोव्याबद्दल बांधलेले अंदाज अनेकवेळा अपूर्ण माहिती आणि ऐकीव अथवा वाचण स्वरूपात समजलेल्या माहिताच्या आधारवर असतात. त्यातूनच गैरसमज निर्माण होतात. अशाच काही गैरसमजावरील पडदा आज आपण हटवण्याचा प्रयत्न करणार आहोत.

गैरसमज - गोव्यातील लोक मद्यपी, व्यसनी आणि वेश्या व्यवसायात गुंतले आहेत.

सत्य काय - मुळात अनेक वर्षे गोव्याची अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे. पण हा समज पूर्णपणे चूक असून, त्यात काही तथ्य नाही. गोव्यातील निसर्गसौंदर्य, बीच पार्टी, नाईटलाईफ, कॅसिनो यासाठी राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. पण, अशा ठिकाणी गोव्यातील स्थानिक लोकांचा सहभाग अतिशय कमी असतो.

त्याऐवजी गोव्यातील लोक घरी आराम करणे पसंद करतात, मग फुटबॉल सामना पाहणे, पुस्तक वाचणे नाहीतर आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणे अशा गोष्टी ते करतात. तसेच, गोव्यातील अनेकजण मद्य आणि अमली पदार्थाच्या आहारी गेले आहेत. हा देखील एक प्रचलित गैरसमज असून त्यात काही तथ्य नाही.

AI Generated Image About Goa

गैरसमज - हिंदी चित्रपटात दाखवलेली 'मारिया' असेच सर्रास चित्र गोव्यात असते

सत्य काय - गोव्यावर 450 पेक्षा अधिककाळ पोर्तुगीजांनी राज्य केले, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर देखील 14 वर्षे गोव्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झगडावे लागले. तेव्हा पासून गोव्यात कॅथलिक समाज अधिक आहे, असा एक गैरसमज आहे. पण, तथ्य असे आहे की गोव्यात कॅथलिक समाज हा दुसऱ्या क्रमांकावर येतो तर, राज्यात हिंदू समाज सर्वाधिक आहे.

त्यामुळे हिंदी चित्रपटात दाखवलेली शॉर्ट ड्रेस आणि गळ्यात क्रॉस घातलेली मारिया असे सर्रास चित्र गोव्यात नसते. सगळ्यात विशेष बाब म्हणजे गोव्यातील सर्व समाज गुण्यागोविंदाने राहतात आणि सर्व सण, उत्सव एकत्र आणि आनंदाने साजरे करतात.

Old Goa Church

गैरसमज - गोवा शाकाहारी आणि मद्य न पिणाऱ्या लोकांसाठी योग्य ठिकाण नाही

सत्य काय - गोवा फक्त मासे खाणारे, मांसाहार, मद्य पिणाऱ्या लोकांसाठी असून, तो शाकाहारी आणि मद्य न पिणाऱ्या लोकांसाठी योग्य ठिकाण नाही असाही एक प्रचलित समज आहे. पण ते खरे नाही.

गोव्यात तुम्हाला सर्व प्रकारचे खाद्यप्रकार मिळतात आणि अगदी उत्कृष्ट चवीचे शाकाहारी जेवण देखील येथे योग्य दरात उपलब्ध आहे. शाकाहारी प्रकारात गोवन पद्धतीचा भाजीपाव नाष्टा ते उत्तम वेज थाळी येथे तुम्हाला मिळू शकते. याशिवाय फळे, ज्यूस आणि शितपेयांची पर्वणी आहेच.

गैरसमज - गोव्यातील लोक निवांत असतात (सुशेगाद)

सत्य काय - आपण अनेकवेळा गोव्यातील लोकांचे बरमुडा आणि बनियन घालून निवांत समुद्रकिनारी बियरवर ताव मारणारे चित्र पाहिले आहे. यात थोडफार सत्य आहे पण, ते पूर्णपणे खरे नाही. गोव्यातील अनेक लोक सकाळी नऊ ते सायंकाळी पाच यावेळेत कामावर असतात. याशिवाय उतर लोक येथील पर्यटन संबधित व्यवसायात गुंतलेले पाहायला मिळतात.

Goan Food And Beach
Sinquerim Beach

गैरसमज - गोव्यातील लोक खुल्या विचारसरणीचे आणि पुरोगामी आहेत

सत्य काय - गोव्यातील महिलांचे चित्रपटात नेहमीच परदेशी वेशातील चित्रण करण्यात आले आहे. त्यांना अधिक बोल्ड आणि खुला विचारसरणीचे दाखवण्यात आले आहे.

पण, राज्यात महिलांना मिळणारी संधी मर्यादीत आहे. मागील वर्षील झालेल्या विधानसभा निवडणुकीत 40 आमदारांमध्ये केवळ तीन महिला आमदारांना संधी मिळाली आहे. जे प्रमाण केवळ 7.5 टक्के एवढे आहे.

राज्यात समान संधीच्या बाबतीत महिला काहीशा मागे पडलेल्या दिसतात. महिलांच्या प्रचंड उर्जा आणि बुद्धीमत्तेचा राज्यातील प्रगतीत समावेश करून गरजेचे आहे. तेव्हाच खुली विचारसरणी आणि पुरोगामी हे शब्द नाय्य ठरतील.

- अबीगेल क्रॅस्टो

(सदर लेख हा गोमन्तक टाइम्सवर प्रसिद्ध झाला असून इंग्रजीतील हा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT