Crime News Dainik gomantak
गोवा

बनावट कागदपत्रांच्या आधारे गोव्यातून मिळवला पासपोर्ट; पुण्यात 5 बांगलादेशी नागरिकांना अटक

गुन्हे शाखेच्या दहशतवाद विरोधी विभागाने निगडी पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली.

Pramod Yadav

Illegal Bangladeshi Nationals Arrested In Pune: अवैध पद्धतीने वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या दहशतवाद विरोधी विभागाने निगडी पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली.

अटकेतील पाच जणांपैकी तिघांनी बनावट कागदपत्रांच्या मदतीने गोव्यातून पासपोर्ट मिळवल्याचे तपासातून उघड झाले आहे.

रॉकी सामोर बरुआ (वय 28), जयधन अमिरोन बरुआ (वय 28), अंकुर सुसेन बरुआ (वय 26), रतुल शेल्फोन बरुआ (वय 28), राणा नंदन बरुआ (वय 25) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सर्वजण बांगलादेशचे रहीवासी आहेत.

यातील पुण्यातील चंदननगर येथील जॉय चौधरी या नावाने ओळखला जाणारा जिकू दास सध्या फरार आहे.

दहशतवाद विरोधी सेलचे पोलीस हवालदार सुयोग लांडे यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बांगलादेशी नागरिकांनी बनावट जन्म प्रमाणपत्रे आणि इतर बनावट कागदपत्रांद्वारे आधारकार्ड तयार केल्याची माहिती समोर आली आहे.

सर्वजण निगडीतील साईनाथनगर येथील चाळीत राहत होते, आरोपींनी आधार कार्डावरील पत्ता बदलून पुणे असा केला होता.

आरोपींपैकी तिघांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून गोव्यातून यशस्वीरित्या पासपोर्ट मिळवल्याचे तपासात दिसून आले. तर इतर दोघांसाठी पासपोर्ट मिळवण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 22 November 2024: व्यवसायात चांगला फायदा होईल, प्रेम प्रकरणात यश मिळेल; पण कोणाला?

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

SCROLL FOR NEXT