Cattle disrupted traffic in Mhapsha Dainik Gomantak
गोवा

अज्ञात वाहनाच्या धडकेने पाच गुरे दगावली

हे अज्ञात वाहन मडगावच्या दिशेने जात होते.

दैनिक गोमन्तक

काणकोण: मडगाव-कारवार हमरस्त्यावर माड्डीतळप येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पाच गुरे दगावली. ही घटना बुधवारी मध्यरात्रीनंतर घडली. हे अज्ञात वाहन मडगावच्या दिशेने जात होते. हमरस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या गुरांना त्या वाहनाने ठोकरल्याने ही गुरे हमरस्त्यावर ऐसपैस पडली.

(Five cattle were killed in a collision with an unknown vehicle in goa)

सकाळी काही वाहनचालकांनी रस्त्यावर असहाय्य अवस्थेत पडलेल्या गुरांना पाणी पाजण्याचा प्रयत्न केला; मात्र तो यशस्वी झाला नाही. सध्या पंचायत निवडणुकीमुळे पंचायतीचा ताबा प्रशासकांकडे आहे. मात्र आजपर्यंत लोलये पंचायत क्षेत्रात पोळे ते तामनेपर्यंत कुठेही अपघातात गुरे मरून पडल्यास पंचायत स्वखर्चाने या गुरांची विल्हेवाट लावत होती. आता प्रशासकाने किंवा बांधकाम खात्याच्या हमरस्ता विभागाने हे काम करणे अपेक्षित होते. मात्र सकाळी १० वाजेपर्यंत ही दगावलेली गुरे रस्त्यावरून हटवली नसल्याने रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत होती. त्यामुळे माजी पंच निशांत प्रभुदेसाई यांनी स्वखर्चाने या गुरांना हटवून त्यांना दफन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT