Goa Verna IDC Accident Case Dainik Gomantak
गोवा

Verna IDC Accident: वेर्णा अपघातात 5 बिहारी मजुरांचा मृत्यू, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्यक्त केले दु:ख

Verna IDC Accident: बांधकाम कामगार गाढ झोपेत असताना एक बस झोपडीत घुसली यात चार जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले.

Pramod Yadav

Verna IDC Accident

वेर्णा औद्योगिक वसाहतीत झालेल्या अपघातात बिहारच्या पाच कामागारांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेला अत्यंत दुःखद असल्याचे म्हटले आहे.

या अपघातात जखमी झालेल्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना देखील त्यांनी केली आहे.

शनिवारी (दि. 25) रात्री अकराच्या सुमारास मजूर झोपडीत झोपले असताना, एक बस झोपडींमध्ये घुसली. यात अनेक कामगार चिरडले. यापैकी चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन मजूर जखमी झाले. उपचारादरम्यान आणखी एका मजुराचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या चंपारण जिल्ह्यातील हरसिद्धी पोलीस ठाणे हद्दीतील घाटुली गावातील सुमारे दोन ते अडीच डझन मजूर गोवा येथील बांधकाम कंपनीत काम करतात. आठवडाभरापूर्वी गावातील हे सात मजूर गोव्याला गेले होते. सर्वजण बांधकाम कंपनीत मजूर म्हणून काम करू लागले आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडीत राहू लागले.

शनिवारी रात्री जेवण करून सर्वजण झोपले. सगळे गाढ झोपेत होते. त्याचवेळी एक नियंत्रित बस त्यांच्या झोपड्यांमध्ये घुसली. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'झुरळ' शब्दाने भडकवला बेरोजगारांचा वणवा! 'कॉक्रोच जनता पार्टी'ने हादरवली दिल्ली

फेब्रुवारीतील इशारा ऐकला असता तर... सरकारवर नामुष्कीची आणि लाखो मुलांच्या जीव टांगणीला लागण्याची वेळ आली नसती; CBSE चा 'महा'घोटाळा चव्हाट्यावर!

Goa ST Reservation: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाचे डोळे दिल्लीकडे, गोव्यात आरक्षणाचा सर्वात मोठा सस्पेन्स; अमित शहा आठवडाभरात भूमिका करणार स्पष्ट?

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

SCROLL FOR NEXT