Stop Fishing
Stop Fishing Dainik Gomantak
गोवा

गोव्यात खाजन मानशीचा लिलाव होईपर्यंत मासेमारी बंद

दैनिक गोमन्तक

पणजी: करमळीतील धाडे खाजन मानशीचा लिलाव होत नाही तोपर्यंत मासेमारी बंद ठेवावी, मानशीसाठी लिलाव प्रक्रिया तीन आठवड्यांत पूर्ण करावी, धाडे खाजन कूळ संघटनेच्‍या अध्यक्षाने त्याची पाहणी करावी तसेच जुने गोवे पोलिसांनीही मासेमारी होणार नाही यासाठी तेथे देखरेख ठेवावी, असे निर्देश देत मुंबई उच्च न्‍यायालयाच्‍या गोवा खंडपीठाने यासंदर्भातील याचिका निकालात काढली.

करमळीतील या मानशीवर बेकायदा मासेमारी सुरू असल्याची याचिका नीळकंठ फडते व अन्‍य दोघांनी सादर केली होती.

आज या याचिकेवरील सुनावणीवेळी अध्यक्ष नाझारेथ डिमेलो यांनी बाजू मांडताना सांगितले की, दर मानशीचे (स्ल्युस गेट) मासेमारी करण्याचे हक्क धाडे खाजन टेनंट असोसिएशनकडे असून त्याचा गैरवापर होत आहे. स्ल्युस गेट व बांधाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या मानशीचा लिलाव केला जात नाही. याचिकादाराच्या वकिलांनी त्याला आक्षेप घेत अध्यक्षांनीच स्ल्युस गेटची दारे काढून बांधाची मोठी हानी केली. तसेच बेकायदेशीर मासेमारी करून अध्यक्ष असोसिएशनचे नुकसान करत असल्याची बाजू मांडली.

यावर खंडपीठाने स्‍पष्‍ट केले की, लिलाव वेळेवर घेणे हा संघटनेचा नियम आहे. या मानशीच्या लिलावाबाबतची नोटीस तिसवाडी मामलेदार काढतील व लिलाव प्रक्रिया तीन आठवड्यांत पूर्ण करतील. सध्या धाडे खाजन मानशीच्या ठिकाणी मासेमारी होत नाही व अध्यक्ष नाझारेथ डिमेलो हेसुद्धा मासेमारी करत करत नाही. त्यानुसार त्यांनी पुढील लिलाव होईपर्यंत या मानशीच्या ठिकाणी मासेमारी होणार नाही व कोणलाही तेथे मासेमारी करण्यात दिले जाणार नाही याची खबरदारी घ्‍यावी. तसेच जोपर्यंत लिलाव होत नाही तोपर्यंत या मानशीवर मासेमारी होणार नाही याची खातरमजा जुने गोवे पोलिसांनी करावी, असेही खंडपीठाने दिलेल्या निर्देशात नमूद केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Goa's News Wrap: ताळगाव निवडणूक निकाल, फोंड्यात खून; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT