फातोर्डा येथे आढळला मृतदेह

कोलवा पोलिसांनी या प्रकरणाची अनैसर्गिक मृत्यू अशी नोंद
Dead Body
Dead Body Dainik Gomantak

फातोर्डा: करमणे येथे कनर्ल सिंग हा इसम मृतावस्थेत सापडला. कोलवा पोलिसांनी या प्रकरणाची अनैसर्गिक मृत्यू अशी नोंद केली आहे. घटनेची पोलिसांना माहिती मिळताच त्याला दक्षिण गोवा जिल्हाधिकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी तेथे तैनात असलेल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मयताची ओळख पटली असली तरी त्याचा गाव व इतर माहिती मिळू शकली नाही.

Dead Body
International Women's Day 2022: प्रतिभेला मोकळी भरारी मारण्याची संधी द्या

अवैध दारू बाळगली; दोघे अटकेत

मडगाव कोकण रेल्वे स्थानकावर बेकायदा दारू बाळगल्याप्रकरणी कोकण रेल्वे पोलिसांनी उत्तरप्रदेश येथील दोन युवकांवर गुन्हा दाखल केला आहे. आज सायंकाळी 4.10 वाजता रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर पोलिस कॉन्स्टेबल विराज नाईक देसाई टेहाळणी करीत असताना दोन युवकांना हटकले आणि त्यांच्या बॅगची तपासणी केली असता आतमध्‍ये 245 दारूच्‍या बाटल्‍या सापडल्या. पोलिसांनी जप्त केलेल्‍या या सर्व बाटल्या नंतर अबकारी खात्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. संशयितांची नावे राजन रावत व ए. रावत अशी आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com