Fishing and Water Sports Ban Due to National Games Dainik Gomantak
गोवा

National Games: राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमुळे गोव्यातील मासेमारी-जलक्रीडा राहणार बंद?

गोव्यात होणाऱ्या 37 व्या राष्ट्रीय खेळांसाठी राज्यात जोरदार तयारी सुरू आहे.

Kavya Powar

Fishing and Water Sports Ban Due to National Games

गोव्यात होणाऱ्या 37 व्या राष्ट्रीय खेळांसाठी राज्यात जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने तीन समुद्रकिनाऱ्यांवर मासेमारी आणि जलक्रीडा उपक्रमांवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. मात्र या निर्णयाला निषेध करण्यात आला आहे.

यासोबतच प्रशासनाने कलम 144 देखील लागू केले आहे; ज्यामध्ये चार किंवा त्याहून अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी आहे.

उत्तर जिल्हाधिकारी स्नेहा गिते यांंनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, वायंगिणी बीच, हवाई बीच (दोना पावला) आणि शापोरा नदीवर होत असलेले रोइंग, नौकानयन, कॅनोइंग आणि कयाकिंग यांसारख्या जलक्रीडा तसेच मासेमारीवर 27 ऑक्टोबर 2023 पासून बंदी 8 नोव्हेंबर 2023 पर्यंत घालण्यात आली आहे.

गोव्यात 26 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय खेळांमुळे सुरक्षा उपायांचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच राष्ट्रीय खेळातील सहभागी आणि उपस्थितांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेने कडेकोट बंदोबस्त केला आहे. मात्र अचानक घेतलेल्या या निर्णयावर मासेमारी संघटनांनी निषेध वर्तवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT