Illegal Casino in Goa: राज्याला अवैध धंद्यानी विळखा घातला आहे. यातच राज्य सरकार याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे राज्य संयोजक ॲड. अमित पालेकर यांनी केला आहे.
सध्या तिसवाडी तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध कॅसिनो सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यावरून पालेकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
तिसवाडी तालुक्यात अनेक ठिकाणी घर, फ्लॅट किंवा बंगल्यांमध्ये अवैधरित्या कॅसिनो सुरू आहेत. यावर गुन्हे शाखेने कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र सर्वजण राजकारण करण्यात व्यस्त आहेत. हे कॅसिनो एक संघटित टोळी चालवत असल्याचे समोर आले आहे.
या अवैध कॅसिनोमध्ये गोव्यातील अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. तरीही सरकारचे याकडे लक्ष का नाही? असा सवाल अमित पालेकर यांनी केला आहे.
दरम्यान, राज्यातील किनारपट्टी परिसरातील ड्रग्ज व्यवसायातील दलाल तसेच विक्रेते हे आता तिसवाडीतील ताळगाव, मेरशी, चिंबल व सांताक्रुझ या परिसरापर्यंत पोहोचले आहेत. ताळगावातील युवा पिढी या ड्रग्जच्या आहारी जात आहे.
या ड्रग्जचा फैलाव या परिसरात करण्यामध्ये एका राजकारण्याशी जवळीक तसेच गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या एका समाजकंटकाचा हात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.