मच्छीमारी ट्रॉलर्स Dainik Gomantak
गोवा

मच्छीमारी ट्रॉलर्स गोव्याच्या किनाऱ्यावरच

पणजी मालिम जेटीवरून मासेमारीसाठी गेलेले दोन ट्रॉलर जोरदार वाऱ्यामुळे माघारी फिरले.

दैनिक गोमन्तक

पणजी: मासेमारीवरील (Fishing) दोन महिन्याची बंदी परवा मध्यरात्री उठल्यानंतर राज्यातील (Goa) नागरीक ताज्या मासळीची आस लावून बसले असताना जोरदार वादळी वाऱ्यामुळे व कामगारांच्या कमतरतेमुळे राज्यातील मच्छीमारी ट्रॉलर अद्याप किनाऱ्यावरच आहेत. काल पणजी मालिम जेटीवरून मासेमारीसाठी गेलेले दोन ट्रॉलर जोरदार वाऱ्यामुळे माघारी फिरले. हवामान खात्यानेही खोल समुद्रात सध्या न उतरण्याची सूचना मच्छीमारांना केली आहे, अशी माहिती मच्छीमार खात्याच्या अधीक्षक मेघा केरकर यांनी दिली. (Fishermen trawlers in Goa are on shore due to shortage of workers)

गोव्यातील महत्त्वाच्या कुटबण आणि मालिम जेटीवरून दुसऱ्या दिवशीही एकही ट्रॉलर्स समुद्रात गेला नाही. आणखी काही दिवस मासेमारीला वातावरण अनुकूल नसल्‍याचे मच्छीमार खात्याने म्हटले असून 10 ऑगस्टनंतरच मच्छीमारी ट्रॉलर खोल समुद्रात उतरण्याची शक्यता आहे.

मागील दोन महिने मासेमारीला बंदी होती त्यामुळे गोमंतकीयांना ताज्या ‘नुस्‍त्या’ची आस लागून राहिली आहे. काही ट्रॉलर्सवरील कामगार अद्याप गोव्यात दाखल झाले नसले तरी मच्छीमारांनी सर्व सज्जता ठेवली आहे. समुद्रात वादळी वारे असल्याने मासेमारीसाठी ट्रॉलर्स समुद्रात गेलेले नाहीत. परिणामी, बाजारात कमी प्रमाणात मासळी आहे. एकिकडे कामगारांची वानवा आहे. त्यात वादळी वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला असल्यामुळे मासेमारीत व्यत्यय आला आहे.

राज्यात 1104 ट्रॉलर्स आहेत. त्यातील 850 चालू स्थितीत आहेत. डिझेलचे दर वाढले आहेत. जो खर्च मासेमारीसाठी होतो त्यात सर्वात जास्त रक्कम डिझेलसाठी खर्च होते. 15 ऑगस्टनंतर काही ट्रॉलर्स मासेमारीसाठी जाऊ शकतात. विविध कारणांमुळे ट्रॉलर समुद्रात नेण्यास मालक अनुत्सुक आहेत.

- हर्षद धोंड, अध्यक्ष, अखिल गोवा ट्रॉलर मालक संघटना.

ट्रॉलर मालक त्रस्त

अनुदानाच्या स्वरुपात मिळणारे इंधन कुटबनशिवाय इतर ठिकाणी मिळत नसल्याने ट्रॉलर मालक त्रस्त आहेत. वादळी वाऱ्यामुळे ट्रॉलर्सना खोल समुद्रात जाण्यास परवानगी नाही. कामगार परतलेले नाहीत. ट्रॉलर्स समुद्रात घेऊन जाणे धोकादायक असल्याने ट्रॉलर्स किनाऱ्यावरच आहेत.

यंदा मासे मोठ्या प्रमाणात मिळणार

राज्यात मागील दोन वर्षांत मासेमारी घटली आहे. पण यंदा तब्बल दहा वर्षांनंतर राज्‍यात मोठ्या प्रमाणात तिसरे मिळाले होते. त्यामुळे या हंगामात 22 प्रकारचे मासे मोठ्या प्रमाणात मिळतील, असा अंदाज मच्छीमारांनी व्यक्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT