Boat  Dainik Gomantak
गोवा

Fisheries Union: बोटींच्या नुकसान भरपाईपायी मच्छिमारांनी केलीय 'एवढ्या' रकमेची मागणी

मच्छिमारांची मागणी: खात्याकडून भरपाई देण्यात दुजाभाव

गोमन्तक डिजिटल टीम

Fisheries Union काकरा येथे डिसेंबर 2022 मध्ये किनाऱ्यावरील बोटी जळाल्या होत्या. त्या मच्छिमारांना नुकसानीपोटी मच्छीमार खात्याकडून योग्यरित्या भरपाई मिळायला हवी होती.

किमान नुकसान भरपाई म्हणून 2 लाख रुपये तरी मच्छीमार खात्याने द्यायला हवे होते, असे मत अखिल गोवा स्मॉल स्केल रिस्पॉन्सीबल फिशरिज युनियनने (एजीएसएसआरएफयू) व्यक्त केले.

एजीएसएसआरएफयूचे सदस्य संजय फातर्पेकर (काकरा), चंद्रशेखर कुट्टीकर, मंगेश सावंत (ओडशेल), सी. शिरवईकर, लक्ष्मण मंगेशकर (शिरदोण), योगेश सामंत (काकरा), योगेश मंगेशकर (काकरा) यांनी आझाद मैदानावर पत्रकार परिषद घेतली.

काकरा येथे किनाऱ्यावर असणाऱ्या पारंपरिक मच्छिमारांच्या बोटी जळाल्या होत्या. त्यानंतर आम्ही मच्छीमार खात्याकडे नुकसान भरपाई मागितली होती, त्यात 40 हजार रुपये बोटीसाठी भरपाई देण्यात आली, परंतु माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार फिलीप नेरी मच्छीमार मंत्री असताना 5 मच्छिमारांना 22 लाख 11 हजार 600 रुपये, त्यानंतर 19 जणांना 53 लाख 77 हजार रुपये नुकसान भरपाई दिली आहे. आम्हाला केवळ 40 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे.

आम्ही यापूर्वी मच्छीमार खात्याला निवेदन दिलेले आहे. मच्छीमार मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी याप्रकरणी लक्ष घालून स्थानिक मच्छिमारांवर अन्याय होऊ देऊ नये, असे फातर्पेकर म्हणाले. बोटी जळाल्यानंतर त्यांचा पोलिसांनी पंचनामाही केला होता. त्याचबरोबर मरीन सर्व्हेही झाला होता.

‘जेनिफर मोन्सेरात यांनी लक्ष घालावे’

आमच्या समस्या ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात सोडवित आल्या आहेत. त्यांनी याप्रकरणी लक्ष घातल्यास आमची ही समस्या सुटू शकते, असेही एजीएसएसआरएफयूने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

समुद्राचा नवा 'सिकंदर'! भारतीय नौदलात 'रोमियो' हेलिकॉप्टरचा दुसरा स्क्वॉड्रन दाखल; चीन-पाकिस्तानच्या पाणबुड्यांना शोधून मारणार VIDEO

Video: धुरंधर यश मिळतोय, मग अक्षय खन्ना कुठंय? रेहमानचा आध्यात्मिक अवतार, अलिबागच्या घरात करतोय 'होम हवन'

Goa Nightclub Fire: '25 लाखांचा हप्ता आणि 25 बळी', लाचखोरीमुळे निष्पापांचा गेला जीव, खासदार विरियातोंचा दावा; सरकारला धरले धारेवर

Crime News: बुरख्यावरुन वाद अन् तिहेरी हत्याकांड! चहा बनवताना बायकोच्या डोक्यात झाडली गोळी, आवाज ऐकणाऱ्या चिमुकल्या मुलींनाही नराधम बापानं सोडलं नाही

Goa News Live: 'पाटकर यांनी आधी काँग्रेसवर लक्ष केंद्रित करावे'

SCROLL FOR NEXT