fishermen along with the farmers, special provision made in the budge  Dainik Gomantak
गोवा

शेतकऱ्यांसह मासेमारी व्यावसायिकांना अच्छे दिन, अर्थसंकल्पात केली खास तरतूद

वार्षिक 3 गॅस सिलिंडर मोफत, 40 कोटींची तरतूद

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात विधानसभा मंत्रिमडळाच्या सोमवारी झालेल्या शपथविधीनंतर आज बुधवारी अर्थसंकल्प सादर केला जात आहे. रोजगार संधी, पर्यटन आणि साधन सुविधांची निर्मिती करणारा, खनिज उद्योग आणि कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देणारा राज्याचा 2022-23 चा अर्थसंकल्प बुधवारी विधानसभेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) हे अर्थमंत्री या नात्याने त्यांनी सादर केला आहे. हा अर्थसंकल्प 24,467.40 कोटींचा आहे.

दरम्यान, सर्व शेतकर्‍यांना 3 लाखांपर्यंतचे कर्ज 0 टक्के व्याजदराने देण्यात येणार आहे. . त्यामुळे शेतकरी आपला शेती (Agriculture) पूरक व्यवसाय किंवा शेतीसाठी हे भांडवल वापरू शकणार आहेत. ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तसेच मासेमारीस (fishermen) प्रोत्साहन देण्यासाठी 10 बायोफ्लॉक उभारण्यात येणार आहेत. या अर्थसंकल्पात (Budget) मासेमारी व्यवसाय करणाऱ्यांसाठी देखील तरदूत करण्यात आली आहे. त्यामुळे या वर्गात देखील आनंदाचे वातावरण दिसत आहे. भाजपने 2022 च्या विधानसभा निवडणुकीत 3 गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा केली होती. याच पार्श्वभूमीवर आता वार्षिक 3 गॅस (LPG) सिलिंडर मोफत देण्यासाठी 40 कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती देखील प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

दरम्यान, यावेळी अर्थसंकल्पात (Budget) सरकारी कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्ती योजना आणली जाणार असल्याची माहिती प्रमोद सावंत यांनी दिली. तसेच यासाठी 10 कोटींची तरतूद केली आहे. अशी माहिती देखील यावेळी सावंत यांनी दिली.

त्याचबरोबर उद्योग आणि खाणी (Mining) क्षेत्रांसाठी 340 कोटींचा निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे काणकाम व्यवसाय पुन्हा सुरू होणार असल्याची पुष्टी दिली आहे. तसेच यावेळी बोलताना सावंत म्हणाले की खाण महामंडळाची स्थापना करुन खाणपट्ट्याचा विकास केला जाणार आहे. तसेच जलस्रोत खात्यासाठी 540.02 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी आपला शेती पूरक व्यवसाय किंवा शेतीसाठी हे भांडवल वापरू शकणार आहेत. ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT