Mormugao municipality Dainik Gomantak
गोवा

Murmugao municipality च्‍या गलथान कारभाराविरोधात मासळी विक्रेते आक्रमक; चक्क पालिकेच्‍या दारातच...

किरकोळ विक्रेते आक्रमक : घाऊक व्यावसायिकांना रोखा

गोमन्तक डिजिटल टीम

Mormugao municipality अनेकदा विनंत्या करूनही मुरगाव पालिका घाऊक विक्रेत्यांना मासळी विक्री करण्यापासून न रोखल्याने मासळी मार्केटमधील किरकोळ विक्रेत्यांनी आज सकाळी पालिकेबाहेर मासळी विक्री करून आंदोलन केले.

घाऊक विक्रेत्यांचा व्यवसाय पूर्णपणे बंद होत नाही, तोपर्यंत विक्रेते पालिकेबाहेर मासळी विक्री करण्याचे बंद करणार नाहीत, असा इशारा दिला.

मात्र, नंतर वास्को पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी मासळी विक्रेत्यांची समजूत काढून घाऊक विक्रेत्यांवर कारवाईची ग्वाही दिल्यानंतर मासळी विक्रेत्यांनी तेथून जागा सोडली.

जोपर्यंत घाऊक मासळी विक्रेत्यांचा व्यवसाय बंद पाडत नाही, तोपर्यंत आम्ही नवीन मासळी मार्केट बांधकामास सहकार्य करणार नसल्याचे सांगून मासळी विक्रेत्यांनी नवीन मार्केटमधून जागा सोडली नाही.

घाऊक विक्रेत्यांमुळे आमचा व्यवसाय ठप्प-

1 मासळी मार्केटमधील किरकोळ मासळी विक्रेते आणि घाऊक मासळी विक्रेते यांच्यात गेली दहा वर्षे घमासान सुरू आहे.

2 घाऊक मासळी विक्रेत्यांमुळे विक्रीवर परिणाम होत असून आमच्याकडे गिऱ्हाईक पाठ फिरवतात, असे मासळी विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

3 घाऊक विक्रेत्यांना मासळी विक्री करण्यापासून बंद करा, अशी मागणी महिला मासळी विक्रेत्यांची गेल्या दहा वर्षापासून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Road Closure: दाबोळी-वेर्णा वाहतूक वळविली, 29 पासून कार्यवाही; कुठ्ठाळी-चिखली महामार्गावरून अवजड वाहतूक

Horoscope: तुमचे प्रेम संबंध होणार मजबूत! 'या' 5 राशींसाठी आजचा दिवस आहे 'रोमान्स'ने भरलेला

Jetty Project Goa: जेटीचे काम थांबवा, अन्यथा पणजीत मोर्चा; ग्रामस्थांचा इशारा; असोल्डा, शेळवण, होडर येथील प्रकल्पाला विरोध

Goa Employee Marital Data: 12,907 कर्मचारी 'शुभमंगल' विना; नियोजन, सांख्‍यिकी मूल्‍यमापन खात्‍याच्‍या अहवालातून समोर

Betul Port Project: बेतुलात बंदर प्रकल्प नकोच! कॉंग्रेस, फॉरवर्डचे एकमत; 'एमपीए'च्या उपक्रमाला स्थानिकांतून विरोध

SCROLL FOR NEXT