Fishing Ban in Goa Dainik Gomantak
गोवा

Fish Price Hike In Goa: राज्यात मासळी पुन्हा महागली!

पापलेट हजार तर इसवण आठशे रुपये किलो

दैनिक गोमन्तक डिजिटल

राज्यात मासळीच्या दरात वाढ झाली असून इसवण सातशे ते आठशे, तर पापलेट हजार रुपये किलो झाला आहे. मासळीची आवक घटल्याने अनेक विक्रेते अल्प प्रमाणात मासळी बाजारात आणत असल्याने दरात वाढ झाली आहे.

आठवड्यात दीडशे रुपये किलो दराने मिळणारे बांगडे आता २०० रुपये किलो, बांगड्याचा दरही म्हणजे सर्वसामान्यांना परवडेनासा झाला आहे.इसवण आठशे, तर पापलेट १ हजार रुपये किलो दराने विकला जात आहे. लेपो २५० -३०० रुपये, सुंगटे (कोळंबी) आकाराप्रमाणे ३०० ते ५०० रुपयांनी विकली जात आहेत. तारली देखील १५० ते २०० रुपये किलो दराने विकली जात आहेत.

शनिवारी पणजी मासळी बाजारात इसवण, कर्ली, लेपो, माणकी, खुबे, कोळंबी, समुद्री खेकडे आदी विविध प्रकारची मासळी मुबलक प्रमाणात विक्रीस उपलब्ध होती. मासळी खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ अधिक होती. काही मासळी विक्रेते किलोच्या दरात विकत होते; तर काहीजण वाट्याच्या दराने विकत होते. वाट्याच्या दराने लहान बांगडे १५० रुपयांना ८ ते १० या दराने उपलब्ध होते.

मासळीचे हुमण, फिश फ्रायचा आस्वाद चाखण्यासाठी अनेक खवय्ये तसेच पर्यटक गोव्यात येतात. मात्र, वाढत्या मासळीच्या दरामुळे मासळी प्लेटच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणाला तळलेली मासळी आवडते, तर कोणाला हुमणातली, कुणाला इसवणाची पोस्ता आवडतात, तर कुणाला प्रॉन्स फ्राय.

मात्र, काहींना तर दररोजच्या जेवणात मासळी लागतेच लागते. अशावेळी मध्यमवर्गीयांना देखील ताज्या मासळी व्यतिरिक्त सुक्या खाऱ्या बांगड्यांवर दिवस ढकलावे लागत आहेत. येणाऱ्या काळात मासळीचा तुटवडा जाणवल्यास दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT