Fish Curry Rice at Shacks in Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Shacks: फिश करी राईस हे तर गोव्याचं स्पिरिट..! शॅकधारकांकडून गोवा सरकारच्या निर्णयाचे स्वागत

शॅकमध्ये फिश करी राईस देणे केले आहे बंधनकारक

Akshay Nirmale

Goa Shacks: गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर असलेल्या शॅक्समध्ये फिश करी राईस ठेवणे, ते डिस्प्ले करणे सक्तीचे करण्यात आले आहे. आता शॅक व्यावसायिकांनी सरकारच्या या निर्णयाचे खुल्या दिलाने स्वागत केले आहे.

उलट, फिश करी राईस हे तर स्पिरिट ऑफ गोवा दाखवून देणारी बाब आहे, अशा शब्दांत शॅक व्यावसायिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

मच्छीमार आणि शॅक मालकांच्या संघटनेने म्हटले आहे की, फिश करी राईस हा खाद्यपदार्थ म्हणजे गोव्याचे स्पिरिट आहे.

या निर्णयातून थेट गोव्याच्या गोयंकारपपणालाच स्पर्श केला गेला आहे. पर्यटकांना गोव्याच्या पारंपरिक खाद्यपदार्थांची जाणीव करून देण्याची गरज आहे. यामुळे या किनारपट्टीच्या राज्यात खाद्य पर्यटनाला चालना मिळण्यासही मदत होईल.

शॅक ओनर्स वेल्फेअर सोसायटी (SOWS) चे अध्यक्ष क्रुझ कार्डोसो म्हणाले की, आम्ही या नियमाचे पालन करण्यास इच्छुक आहेत. आनंद आहे की, गोव्याच्या पाककृती आणि खासकरून फिश करी-भात शॅक्समध्ये सर्व्ह केले जातील. यामुळे पर्यटकांना फूड टुरिझमची ओळख करून देण्यास मदत होईल.

दक्षिण गोव्यातील मच्छिमार फ्रान्सिस फर्नांडिस यांनी म्हटले आहे की, “फिश करी-राईस हे गोव्याचे स्पिरिट आहे. ज्याची आपण राज्यात येणाऱ्या सर्व पर्यटकांना ओळख करून दिली पाहिजे.

शॅक पॉलिसीच्या माध्यमातून राज्याचे पारंपरिक खाद्य पदार्थ पर्यटन उद्योगाचा भाग करण्यात आले आहेत, हे स्वागतार्ह पाऊल आहे. पर्यटकांना गोव्याच्या पारंपरिक खाद्यपदार्थांबद्दल माहिती व्हायला हवी. सर्व शॅक मालकांनी सरकारच्या नियमांचे पालन केले पाहिजे.

फर्नांडिस यांना गोव्याचे पेले म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला यूकेचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांना दक्षिण गोव्यातील बाणावली समुद्रकिनारी मच्छिमारांच्या मालकीच्या बोटीतून प्रवास घडवला होता.

तसेच गेल्या नोव्हेंबरमध्ये सचिन तेंडुलकरला मासेमारीचे पारंपरिक तंत्रही त्यांनीच दाखवले होते. तसेच सचिनला शिजवलेले मासेही दिले होते.

दरम्यान, रविवारी पर्यटन मंत्री खंवटे म्हणाले होते की, समुद्रकिनाऱ्यांवरील शॅक्समध्ये आता इतर भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पदार्थांसह 'फिश करी-राईस' सर्व्ह करणे सक्तीचे असेल. आम्हाला आमची समृद्ध पाक संस्कृती पर्यटकांसमोर मांडायची आहे.

तिखट आणि मसालेदार चवीसाठी वापरल्या जाणार्‍या नारळाचा वापर असलेल्या पदार्थाचा मेन्यूमध्ये समावेश करणे हा राज्याच्या नवीन शॅक धोरणाचा भाग आहे. गोव्याच्या पाककृतींना प्रोत्साहन देण्याचा उद्देश त्यामागे आहे.

आतापर्यंत किनाऱ्यालगतच्या शॅक्समध्ये उत्तर भारतीय खाद्यपदार्थ दिले जात होते, परंतु या ठिकाणी गोव्याचे पदार्थ उपलब्ध नव्हते. आता मात्र शॅक्समध्ये फिश करी-भात मिळाला पाहिजे, तो डिस्प्लेही झाला पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT