Purple Fest 2023 | Subhash Phaldesai 
गोवा

Purple Fest 2023: गोव्यात प्रथमच दिव्यांगांसाठी राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेचे आयोजन

Purple Fest 2023: गोवा राज्यात पहिल्यांदाच होत असलेल्या 'राज्य दिव्यांगजन आयोग' आयोजित पर्पल फेस्टमध्ये विविध स्पर्धा होणार आहेत.

दैनिक गोमन्तक

Purple Fest 2023: राज्यात पहिल्यांदाच होत असलेल्या राज्य दिव्यांगजन आयोग आयोजित पर्पल फेस्टमध्ये विविध स्पर्धा होत आहेत. यात अखिल भारतीय पॅरा टेबल टेनिस ओपन चॅम्पियनशिप, दृष्टिबाधितांसाठी आंतरराज्यीय क्रिकेट आणि मिस अँड मिस्टर डेफ इंडिया-2023, या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा होतील, अशी माहिती समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी शुक्रवारी दिली.

पर्वरी सचिवालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आयोगाचे अध्यक्ष गुरुप्रसाद पावसकर, खात्याचे ताहा हाझिक, समाज कल्याण सचिव सुभाष चंद्रा, संचालक संध्या कामत, गोवा क्रिकेट असोसिएशनचे डॉ. केतन भाटीकर, सुदेश गावडे, आयपीएचबीमधील मानसोपचार सामाजिक कार्याचे साहाय्यक प्राध्यापक आणि गोवा असोसिएशन ऑफ द डेफचे राहुल कुंकळ्ळीकर उपस्थित होते.

मंत्री फळदेसाई म्हणाले, ऑल इंडिया पॅरा टेबल टेनिस ओपन चॅम्पियनशिप 6 ते 7 जानेवारीदरम्यान मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियम, कांपाल-पणजी येथे होतील. या स्पर्धेसाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2022 आहे. डॉ. भाटीकर म्हणाले, दृष्टिबाधितांसाठी आंतरराज्य क्रिकेट स्पर्धा 4 ते 7 जानेवारी या कालावधीत पर्वरी येथील गोवा क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होतील.

राहुल कुंकळ्ळीकर म्हणाले, 10वी मिस आणि मिस्टर डेफ इंडिया-2023 स्पर्धा पणजी येथे 6 ते 8 जानेवारी 2023 या कालावधीत होईल. ही स्पर्धा ऑल इंडिया डेफ आर्ट्‌स अँड कल्चरल सोसायटी आणि गोवा असोसिएशन ऑफ द डेफ यांच्यात संयुक्तपणे होईल. नोंदणी आणि अधिक माहितीसाठी https://scpwd.goa.gov.in/ ला भेट द्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT