First Solar Boat Launched in Goa; Free travel for initial 15 days
First Solar Boat Launched in Goa; Free travel for initial 15 days Dainik Gomantak
गोवा

गोव्यात पहिली सोलर बोट लॉन्च; सुरुवातीच्या 15 दिवसांसाठी मोफत प्रवास

दैनिक गोमन्तक

पणजी: केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी 10:30 वाजता कॅप्टन ऑफ पोर्ट्स जेट्टी, पणजी येथे आयोजित कार्यक्रमात पहिल्या जेटी आणि हायब्रीड फेरीबोटीचे फेरीबोटचे लोकार्पण झाले.

(First Solar Boat Launched in Goa; Free travel for initial 15 days)

First Solar Boat Launched in Goa; Free travel for initial 15 days

केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) आणि अन्‍य मंत्र्यांची उपस्थिती होती. देशात जलमार्गांचा विकास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या भारतीय जलमार्ग प्राधिकरणाच्या वतीने देशभरातील नद्यांमधील जलमार्गांचा विकास करण्यात येतोय.

जीवाश्म इंधनाचा वापर होऊ नये म्हणून गोवा सरकार सौर फेरी बोटी सुरू करणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

पणजी येथील सोलर इलेक्ट्रिक हायब्रीड फेरी बोट हा पहिला प्रकल्प आहे. हे चोडण ते पणजीपर्यंत केवळ प्रवाशांसाठी प्रायोगिक तत्त्वावर चालवले जाईल. सुरुवातीच्या 15 दिवसांसाठी ते मोफत असेल. या कालावधीनंतर सरकार दर ठरवेल. जीवाश्म इंधनाचा वापर होऊ नये म्हणून गोवा सरकार इतर ठिकाणी सौर फेरी बोटी सुरू करणार आहे. 'त्यांच्या पाठिंब्याबद्दल मी भारत सरकारचे आभार मानतो. तरंगती जेटी हा गोव्यातील दुसरा प्रकल्प आहे', असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

अशी आहे तरंगती जेटी

पणजीत (Panjim) मांडवी नदीमध्ये फेरीबोट धक्क्‍याजवळ ही तरंगती (फ्लोटिंग) जेटी उभारण्यात आली असून त्‍यासाठी 3.9 लाख रुपये खर्च आला आहे. हा तरंगता प्लॅटफॉर्म असून येथे नद्यांमध्‍ये वापरण्यात येणाऱ्या छोट्या बोटी पार्क करता येऊ शकतील आणि प्रवाशांची चढउतार करता येऊ शकेल. या जेटीची लांबी 36 मीटर तर रुंदी 6 मीटर एवढी आहे.

First Solar Boat Launched in Goa; Free travel for initial 15 days

पणजी ते चोडण या मार्गावर सुमारे 15 मिनिटांचा करेल प्रवास

एक्वेरियस शिपयार्ड, दिवार यांनी नदी जलवाहतूक विभाग (RND) साठी अंदाजे 3,97,95,000 रुपये खर्चून सौर फेरीबोट तयार केली आहे. फेरीबोटमध्ये आसनक्षमता 60 जणांसाठी असेल. ही आयआरएस क्लास अंतर्गत तयार केलेली आहे. तसेच या बोटीची गती 12 नॉट्स इतकी आहे. ही बोट बॅटरीवर चालेल आणि कॅटामरन डिझाइनमुळे प्रवासासाठी आरामदायी ठरणार आहे. सौर फेरीबोट पणजी ते चोडण या मार्गावर सुमारे 15 मिनिटांचा प्रवास करेल.

भारताकडे सुमारे 14 हजार 500 किलोमीटरचा जलवाहतूक मार्ग

याअंतर्गत गोव्यात 14 फ्लोटिंग जेटी उभारण्यात येणार आहेत. यापैकी पणजीतील जेटीचा शुभारंभ आज झाला आहे. भारताकडे सुमारे 14 हजार 500 किलोमीटरचा जलवाहतूक मार्ग आहेत. मात्र त्‍याद्वारे होणारी वाहतूक अत्यंत कमी आहे. ती वाढावी आणि रस्त्यांवरील ताण कमी व्हावा यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्‍याचाच एक भाग म्हणून जागोजागी कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या जेटी उभारण्यात येत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

Taleigao VP Election: 'पणजी कधीच सोडणार नाही', बाबूश यांचा विजयानंतर इशारा

Goa Today's Live News Update: उत्तर, दक्षिण गोव्यात भाजपचे 'कमळ' निश्चितच फुलणार

Russian In Goa: मद्यधुंद रशियन जोडप्याचा शिवोलीत राडा; पोलिसांसोबत हुज्जत, 108 ची मदत नाकारली

Loksabha Election 2024 : पंतप्रधान मोदींच्या यशासाठी मतदारांचे आशीर्वाद महत्त्‍वाचे : मुख्यमंत्री सावंत

SCROLL FOR NEXT