Nilesh Cabral, Sadanand Tanavde  Dainik Gomantak
गोवा

School Bus: खासदार निधीतून ‘सर्वोदया’ हायस्कूलला बस, तानावडेंच्या हस्ते शुभारंभ

Suryodaya School School Bus: राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांच्या खासदार निधीतून पहिली स्कूल बस कुडचडे येथील सर्वोदया हायस्कूलला देण्यात आली.

Sameer Panditrao

School Bus for Curchorem School

केपे: राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांच्या खासदार निधीतून पहिली स्कूल बस कुडचडे येथील सर्वोदया हायस्कूलला देण्यात आली. यावेळी विशेष अतिथी म्हणून खासदार सदानंद तानावडे, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल, कुडचडे नगराध्यक्ष प्रसन्न भेंडे, शेल्डेचे जिल्हा पंचायत सदस्य सिद्धार्थ गांवस देसाई, नगरसेवक ऋच्या वस्त, सर्वोदया संस्थेचे चेअरमन नंदन कुडचडकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

तानावडे यांच्या हस्ते बसचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तानावडे म्हणाले की, बस देण्यासाठी मी अनेक शाळांच्या संपर्कात होतो. पण सर्वोदया हायस्कूलने सर्व प्रथम पाठपुरावा केला होता. हायस्कूलच्या मुख्याध्यापिका व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुकही त्यांनी केले.

खासदार निधीतून तानावडे यांनी कुडचडे येथील सर्वोदया हायस्कूलला स्कूल बस दिल्याबद्दल स्थानिक आमदार नीलेश काब्राल यांनी धन्यवाद दिले. यावेळी खासदार तानावडे यांचा संस्थेचे चेअरमन नंदन कुडचडकर व समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कर्तव्यदक्ष तानावडे!

समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले की, तानावडे हे स्वतः एका शालेय संस्थेचे चेअरमन आहेत. तरीही खासदार निधीतून मिळणारी स्कूल बस निरपेक्ष भावनेने दुसऱ्या शाळेला दिली. यातून त्यांची कर्तव्य भावना दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: पालेकरांचा ‘आघाडी’ला हात की खोडा?

Attack on Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करावर दोन ठिकाणी हल्ले; 25 जवान ठार, 3 वाहने उद्ध्वस्त; BLAनं VIDEO केला शेअर

Mhadei Water Dispute: 'म्‍हादई' नदीची ताबडतोब पाहणी करा, सरकारची 'म्‍हादई प्रवाह'कडे मागणी; 'इंटरलोक्युटरी' अर्ज सादर करणार

Dasun Shanaka Century: 12 उत्तुंग षटकार, 4 खणखणीत चौकार... दासुन शनाकाचा 'रुद्र अवतार'! 39 चेंडूत ठोकलं शतक VIDEO

Mormugao Port: मुरगाव बंदरातील कंटेनर वाहतूक ठप्प; नियमित फीडर सेवा बंद पडल्याने उद्योगांना फटका

SCROLL FOR NEXT