पणजी: भारतीय जनता पक्षाच्या (BJP) गोवा निवडणूक (Goa elections) व्यवस्थापन समितीची पहिली बैठक पणजी येथे संपन्न झाली. गोवा राज्य निवडणूक व्यवस्थापन समितीचे निमंत्रक राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांच्यासह या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी , केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, भाजपाचे गोवा प्रभारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadwanis), भाजपाचे गोवा प्रभारी सी .टी. रवी, प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, संघटन मंत्री सतीश धोंड, गोवा भाजपाच्या सहप्रभारी दर्शना जारदोश, निवडणूक व्यवस्थापन समितीचे सहनिमंत्रक व माजी खासदार एडवोकेट नरेंद्र सावईकर ,उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, पंचायतमंत्री मावीन गुदीन्हो, आरोग्यमंत्री विश्वजित राणे , माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर , विज मंत्री निलेश काब्राल, प्रदेश उपाध्यक्ष दत्तप्रसाद खोलकर , माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, भाजपाचे खजिनदार संजीव देसाई, उपाध्यक्ष रमेश तवडकर , आमदार ग्लेन टीकलो, आमदार सुभाष शिरोडकर, आमदार निळकंठ हळर्णकर, सरचिटणीस दामोदर नाईक, उपाध्यक्ष कुंदा चोडणकर तसेच दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या अध्यक्ष सुवर्णा तेंडुलक या बैठकीला उपस्थित होते.
2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला पुन्हा बहुमताने जिंकून आणण्यासाठी या बैठकीमध्ये विविध स्तरावर चर्चा करण्यात आली. भाजपाचे गोवा प्रभारी देवेंद्र फडवणीस हे आज गोव्यामध्ये दाखल झाल्यानंतर ही बैठक घेण्यात आली . जी किशन रेड्डी, श्रीपाद नाईक, देवेंद्र फडणवीस, सी.टी रवी विनय तेंडुलकर, मुख्यमंत्री डॉ. सावंत, प्रदेश अध्यक्ष तानावडे आदींनी या बैठकीत विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.