Saint Francis Xavier Dainik Gomantak
गोवा

Saint Francis Xavier Exposition: 10 वर्षानंतर पहिल्यांदाच समोर आले संत फ्रान्सिस झेवियर यांचे शव; पाहा पहिली झलक

Saint Francis Xavier Exposition Old Goa: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या पार्थिव दर्शन सोहळ्याला ओल्ड गोव्यात सुरुवात झाली आहे.

Pramod Yadav

Saint Francis Xavier Exposition Old Goa

जुने गोवे: गोव्यात संत फ्रान्सिस झेवियर यांच्या पार्थिक दर्शन सोहळ्यात ओल्ड गोव्यात सुरुवात झाली आहे. दहा वर्षातून एकदा पार पडणाऱ्या या सोहळ्याचा मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या उपस्थित शुभारंभ झाला. ओल्ड गोव्यात ४५ दिवस हा सोहळा सुरु राहणार आहे.

procession from the Basilica of Bom Jesus to Se Cathedral Church

दहावर्षातून एकदा संत फ्रान्सिस यांच्या पार्थिवाचे प्रदर्शन आयोजित केले जाते. या सोहळ्याच्या माध्यमातून सर्वांना त्यांच्या दर्शनाची संधी उपलब्ध होते. २०१४ नंतर आता या सोहळ्याला सुरुवात झाली आहे.

संत गुरुवारी सकाळी झेवियर यांचे शव बॅसिलिका बॉम जिझस चर्च मधून से कॅथेड्रल येथे स्थलांतरीत करण्यात आले. यापूर्वी मुख्यमंत्री सावंत आणि राज्यपाल पिल्लई यांनी झेवियर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.

चर्चमधून से कॅथड्रेल येथे त्यांचे अवशेष स्थलांतरीत करत असताना झेवियर यांची दहा वर्षानंतर पहिली झलक समोर आली.

Relics of Saint Francis Xavier

ओल्ड गोव्यातील से कॅथड्रेल येथे संत फ्रान्सिस झेवियर यांचे शव सार्वजनिक दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. तब्बल दहा वर्षानंतर झेवियर यांचे शव समोर आले आहे.

४५ दिवस चालणार सोहळा

संत फ्रान्सिस झेवियर यांचा पार्थिव दर्शन सोहळा तब्बल ४५ दिवस ओल्ड गोव्यात सुरु राहणार आहे. सोहळ्यासाठी राज्य सरकारने जय्यत तयारी केली असून, सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सोहळ्यासाठी देशविदेशातून भाविक हजेरी लावण्याचा अंदाज आहे. सुमारे ८० लाख भाविक या सोहळ्यात हजर राहतील असा अंदाज आहे. २१ नोव्हेंबर २०२४ ते ०५ जानेवारी २०२५ असे ४५ दिवस झेवियर यांचे शव सार्वजनिक दर्शनासाठी उपलब्ध असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT