Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

सायबर गुन्हे तपासाला मिळणार गती!

फॉरेन्सिक लॅब कार्यान्वित : रायबंदर येथे राज्यातील पहिली प्रयोग शाळा

दैनिक गोमन्तक

पणजी: गेल्या काही वर्षात सायबर गुन्हे (Cyber Crime) वाढत आहेत. अशावेळी गुन्ह्यांचा तपासकामासाठी ज्या सायबर फॉरेन्सिक लॅबची आवश्‍यकता होती ती आता रायबंदर येथील सायबर गुन्हे कक्षात कार्यान्वित झाली आहे. प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तपासकामाला आता गती मिळणार आहे. या कक्षामधील पोलिस अधिकाऱ्यांना त्यासंदर्भातील प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती सीआयडी क्राईम ब्रँचचा अतिरिक्त ताबा असलेले अधीक्षक शोबित सक्सेना यांनी दिली.

सायबर फॉरेन्सिक लॅबोरेटरी ही एक अत्याधुनिक, समर्पित सुविधा आहे ज्यामधून विविध डेटा व्यावसायिक व तांत्रिक पद्धतीने शोधून व विश्‍लेषण करणे आता शक्य होणार आहे. या लॅबोरेटरीमुळे सायबर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे त्वरित संशयितांपर्यंत पोहण्यास मदत मिळणार आहे. या लॅबोरेटरीमध्ये एकाचवेळी १६ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्याची सुविधा आहे. त्यामुळे या लॅबोरेटरीचा उपयोग कोणत्याही प्रकारच्या सायबर गुन्ह्याचा तपास करणे शक्य होणार आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या लॅबोरेटरीचा वापर गुन्हे शोध व तपासासाठी केला जाणार आहे.

या लॅबोरेटीच्या मदतीने फॉरेन्सिक तपासकाम तसेच डेटा रिकव्हरी पद्धतीने त्याचा वापर करता येणार आहे. लॅबोरेटरीमध्ये कोणत्याही प्रकारच्या मोबाईल, कॉम्प्युटर व हार्ड डिस्क याची सखोल माहिती मिळवण्यास मदत होणार आहे. विशेष तंत्रज्ञान पद्धती तसेच मार्गदर्शन या लॅबोरेटीच्या माध्यमातून तपास अधिकाऱ्यांना मिळणार आहे.

-शोबित सक्सेना, अधीक्षक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gas Cylinder Seizure: 1021 पैकी 485 सिलिंडर रिकामे, वजनमाप खात्‍याकडून मोजणी; अहवाल मिळाल्‍यानंतर पोलिस करणार कारवाई

UTAA: ‘उटा’ 8 संघटनांनी एकत्र येऊन स्‍थापलेली संस्‍था नव्‍हे! ती 14 व्यक्तींनी केलेली सोसायटी; प्रकाश वेळीप यांचा दावा

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: सराईत गुंड 'टारझन' विरोधात हत्यार कायद्याखाली गुन्हा; अड्डयावर सापडली तलवार

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

SCROLL FOR NEXT