First flight to take off from Goa to Ayodhya on 31st December:
एअर इंडिया एक्सप्रेसने आज (20 डिसेंबर) अयोध्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ३० डिसेंबरपासून सेवा सुरू करण्याची घोषणा केली.
यातील पहिले विमान 30 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता दिल्लीहून निघेल आणि दुपारी 12.20 वाजता अयोध्येत उतरेल, असे एअरलाइनच्या प्रवक्त्याने सांगितले. अयोध्येहून हे विमान दुपारी १२.५० वाजता दिल्लीसाठी निघेल आणि १४.१० वाजता परत पोहोचेल.
एअर इंडिया एक्सप्रेस अयोध्येला भुवनेश्वर, बेंगळुरू, कोची, गुवाहाटी, गोवा, ग्वाल्हेर, जयपूर, पुणे, सुरत, श्रीनगर आणि शारजाह यांसारख्या गंतव्यस्थानांशी जोडणारी सोयीस्कर वन-स्टॉप प्रवास योजना देखील देणार आहे.
दरम्यान गोव्याहून आयोध्येसाठी पहिला फ्लाइट 31 डिसेंबर रोडी उड्डाण घेणार आहे. यासाठी एकल मार्गाचे भाडे 6422 रुपयांपासून 8929 रुपयांपर्यंत आहे.
तर परतीच्या प्रवासाचे भाडे 14001 रुपयांपासून 23096 रुपयांपर्यंत आहे. यासाठी वेगवेगळ्या विमान कंपन्यांनी वेगवेगळे विमान तिकिट दर ठेवले आहेत.
याबाबत बोलताना, एअर इंडिया एक्स्प्रेसचे व्यवस्थापकीय संचालक आलोक सिंग म्हणाले, विमानतळ उघडल्यानंतर एअर इंडिया एक्स्प्रेस अयोध्येतून सेवा सुरू करण्यास उत्सुक आहे. हे देशभरातील टियर 2 आणि टियर 3 शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढवण्याची आमची वचनबद्धता अधोरेखित करते. आम्ही अयोध्येच्या अपेक्षित विकासाबद्दत उत्साहित आहोत, जवळच्या आणि दूरच्या यात्रेकरू आणि प्रवाशांना आकर्षित करत आहोत आणि या रोमांचक विकासाच्या प्रवासाचा एक भाग असल्याचा आम्हाला अभिमान आहे.
अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनासाठी 22 जानेवारी 2024 ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. या तारखेला रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा अभिषेक केला जाणार आहे.
या कार्यक्रमात पंतप्रधान मोदीही सहभागी होणार आहेत. रामलला मंदिराच्या गर्भगृहात विराजमान होणार असून त्यांच्या अभिषेक पूजेसाठी राम मंदिर ट्रस्टने पीएम मोदींना आमंत्रण पाठवले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.