Bhagavat Gita: कोलकात्यात एक लाख लोक करणार गीता पठण, पीएम मोदीही लावणार हजेरी!

Bhagavat Gita: कोलकात्यात गीता पठणाचा मोठा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये एक लाख लोक गीतेच्या श्लोकांचे पठण करतील.
Bhagavat Gita
Bhagavat GitaDainik Gomantak

Bhagavat Gita: कोलकात्यात गीता पठणाचा मोठा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये एक लाख लोक गीतेच्या श्लोकांचे पठण करतील. हा कार्यक्रम तीन हिंदू संघटनांनी संयुक्तपणे आयोजित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

2024 च्या निवडणुकीपूर्वी येथील हिंदू मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने या मोठ्या कार्यक्रमाचा घाट घातला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, बंगाल भाजपचे अध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले. पंतप्रधान मोदींना निमंत्रण देण्यासाठी आलेल्या आयोजकांसह मजुमदारही होते.

पंतप्रधानांनी निमंत्रण स्वीकारले

सुकांत मजुमदार यांनी सोशल मीडियावर (Social Media) लिहिले की, पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले आहे. हा कार्यक्रम 24 डिसेंबर रोजी कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राउंडवर होणार आहे. कोलकात्याला परतल्यानंतर मजुमदार यांनी भाजप या कार्यक्रमाचे आयोजन करत नसल्याचा दावा केला. ते म्हणाले की, कार्यक्रमाशी संबंधित लोक सर्व पक्षांच्या आमदारांना आमंत्रित करतील. यामध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचाही समावेश आहे.

Bhagavat Gita
Mamata Banerjee: ममता बॅनर्जींवरील व्यंगचित्र फॉरवर्ड करणाऱ्या प्राध्यापकाची तब्बल 11 वर्षानंतर सुटका

टीएमसीनेही भाष्य केले

टीएमसीचे राज्य सरचिटणीस कुणाल घोष म्हणाले की, गीतेच्या श्लोकांचे पठण लोकांसाठी चांगले आहे. मात्र याचा फायदा भाजपला (BJP) निवडणुकीत मिळणार नाही. बंगालमधील अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे. भारतीय संस्कृत परिषद, सनातन संस्कृती संसद आणि मोतीलाल तीर्थ सेवा मिशन आश्रम या संस्थांचे आयोजन केले आहे.

यातील दोन संस्थांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये बंगालमधील नादिया जिल्ह्यात कुंभमेळ्याचे आयोजन केले होते. त्याचवेळी, डिसेंबरमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमाला सर्व भारतीय येऊ शकतात, असे सनातन संस्कृती संसदेचे अध्यक्ष प्रदीप्तानंद यांनी सांगितले. याचा राजकारणाशी किंवा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com