Film Festival Dainik Gomantak
गोवा

Film Festival: देशाच्या 'स्वर्गात'ही यंदा फिल्म फेस्टिव्हल! इफ्फी आयोजनाच्या अभ्यासासाठी J&K अधिकाऱ्यांचा गोवा दौरा

IFFI Goa Study For J&K festival: जम्मू काश्मीरमध्ये यंदा प्रथमच चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. राज्यात आयोजित केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) आयोजनाचा अभ्यास त्यासाठी केला जाणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: जम्मू काश्मीरमध्ये यंदा प्रथमच चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. राज्यात आयोजित केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) आयोजनाचा अभ्यास त्यासाठी केला जाणार आहे. यासाठी भारतीय प्रशासकीय सेवा आणि जम्मू काश्मीर प्रशासकीय सेवेतील अधिकारी गोव्यात येणार आहेत.

दरम्यान, हा दौरा जम्मू आणि काश्मीर संघ प्रदेशाच्या पहिल्या चित्रपट महोत्सवाच्या तयारीचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याचा उद्देश इतर महत्त्वाच्या महोत्सवांचे नियोजन आणि अंमलबजावणीची जाण प्राप्त करून घेणे आहे, जेणेकरून जम्मू-काश्मीरमधील आगामी चित्रपट महोत्सव अधिक प्रभावीपणे आयोजित करता येईल.

गोव्यात पाहणीसाठी येणाऱ्यांत सांस्कृतिक विभाग सचिव, पर्यटन संचालक, जम्मू-काश्मीर फिल्म डिव्हिजनचे प्रमुख अधिकारी, माहिती व जनसंपर्क विभागाचे संयुक्त संचालक, विभागीय आयुक्तालयाचे प्रतिनिधी, सांस्कृतिक विभागाचे सहायक सचिव यांचा समावेश असेल. हा दौरा जम्मू-कश्मीर सरकारच्या सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रातील प्रयत्नांचा भाग आहे, ज्यामध्ये चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून राज्याला जागतिक स्तरावर नेण्याचा उद्देश आहे.

इफ्फीमधील आयोजन प्रक्रियेची समज प्राप्त करणे, चित्रपट महोत्सवांमधील विविध कार्यप्रवाहांचा अभ्यास करणे, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांशी सहयोग वाढवणे आणि भागीदारी प्रस्थापित करणे हा दौऱ्याचा उद्देश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Goa 2024: यंदाच्या इफ्फीत खास कार्यक्रमाचे आयोजन; 'इफ्फीएस्टा' करणार उपस्थितांचे मनरिजवण

IFFI Goa 2024: आता तिकिटासाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही, असं करा बुकिंग आणि चित्रपटांचा आनंद घ्या

Goa Today's Live Update: कोट्यवधीचे नुकसान, सहकार क्षेत्रात वेगळ्या प्रकारचा फ्रॉड; मुख्यमंत्री सावंत

Mumbai: गोव्यातून चक्क मृत व्यक्ती आला मुंबईत मतदानाचा हक्क बजावायला, पुढं काय घंडलं? वाचा मतदान केंद्रावरील ड्रामा

Goa Opinion: "सोसायटी शोधायची तर चिटणीस वा अध्यक्ष शोधावा लागतो", गोव्यात सहकार क्षेत्र बळकट करणं का गरजेच?

SCROLL FOR NEXT