First cargo flight to Antarctica from Goa NCPOR
गोवा

मोपावरुन पहिल्यांदाच 'अंटार्क्टिका'कडे झेपावले मालवाहू विमान, वेगाने हाणार रसद पुरवठा

Mopa Airport Goa: या विमानातून सुमारे १८ टन साहित्य, ज्यात वैज्ञानिक साधने, औषधे तसेच संशोधन केंद्रांसाठी लागणाऱ्या वार्षिक आवश्यक वस्तूंचा समावेश आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अंटार्टिकासाठी मालवाहक विमान झेपावले आहे. या उड्डाणामुळे भारताच्या अंटार्क्टिक मोहिमांना आवश्यक असणारा रसद पुरवठा अधिक सक्षम आणि वेगवान होणार आहे.

भारतीय ध्रुवीय संशोधन क्षमतेत ऐतिहासिक टप्पा गाठत, सडा-वास्को येथील राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्रातर्फे हे विमान पाठवण्यात आले आहे. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून काल गुरुवारी हे विमान अंटार्टिकासाठी रवाना झाल्याची माहिती शुक्रवारी (०३ ऑक्टोबर) विमानतळ चालवणाऱ्या 'जीएमआर कंपनीकडून देण्यात आली. या विमानातून सुमारे १८ टन साहित्य, ज्यात वैज्ञानिक साधने, औषधे तसेच संशोधन केंद्रांसाठी लागणाऱ्या वार्षिक आवश्यक वस्तूंचा समावेश आहे.

'आयएल-७६' या विशाल मालवाहू विमानाचे उड्डाण 'ड्रोम्लान' या आंतरराष्ट्रीय नेटवर्क अंतर्गत पार पडले. 'एनसीपीओआर'चे संचालक डॉ. थांबन मेलोथ यांच्या हस्ते या उड्डाणाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्यरत एनसीपीओआर भारताचे ध्रुवीय प्रदेश व दक्षिण समुद्रातील संशोधन कार्य सांभाळते.

वेगाने होणार रसद पुरवठा

१) या थेट मार्गामुळे भारताची ध्रुवीय रसद व्यवस्था अधिक स्वावलंबी होईल आणि अंटाक्टिंक संशोधनातील आपली बांधिलकी अधोरेखित होईल," असे डॉ. मेलोथ यांनी सांगितले.

२) हे विमान दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊनमार्गे अंटाक्टिंक संशोधन केंद्रापर्यंत पोहोचणार आहे. 'भारती' व 'मैत्री' या संशोधन केंद्रांसाठी हिमनदी विज्ञान, समुद्रशास्त्र आणि हवामान अभ्यासाशी संबंधित साहित्य या माध्यमातून पोहोचवले जाणार आहे.

३) या मोहिमेला जीएमआर एरो कार्गो अँड लॉजिस्टिक्स, अल्फा क्रक्स, अल्टिमा अंटाक्टिक लॉजिस्टिक्स आणि दक्षिण आफ्रिकेचे सहकार्य लाभले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Children Kidnap Case: मुले आरोपी रोहित आर्यच्या जाळ्यात नेमकी कशी अडकली? धक्कादायक घटनेची A टू Z कहाणी

Goa Crime: पेडणे गोळीबार घटनेला मोठे वळण! तेरेखोल नदीतील अवैध वाळू उपसा प्रकरणी 7 जणांना अटक

Viral Video: अंगावर चिखल उडवणाऱ्या कारचालकाची तरुणीनं मोडली चांगलीच खोड; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, 'भावाने चुकीच्या व्यक्तीशी पंगा घेतला...'

अंधाऱ्या रात्रीत डिव्हायडरजवळ पडला, दारूच्या नशेत उठणंही होतं मुश्किल; 'बिट्स पिलानी'च्या विद्यार्थ्याचा राडा

Vellim Church Attack: 13 वर्षांनंतर ऐतिहासिक निकाल! वेळ्ळी चर्च हल्ला प्रकरणातील सर्व 22 संशयितांची निर्दोष मुक्तता; मडगाव कोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT