mauvin godinho Dainik Gomantak
गोवा

Mauvin Godinho: आधी नागरिकांमध्‍ये जागृती, मगच ई-चलन!

वाहतूकमंत्री गुदिन्‍हो यांचे स्पष्टीकरण : राज्यातील वाहनचालकांना तूर्त दिलासा

गोमन्तक डिजिटल टीम

Mauvin Godinho वाहतूक नियमांसंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करूनच ई-चलन कारवाई केली जाईल, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी आज दिली. त्यामुळे तूर्त वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रीय महामार्ग 66 वर वाहतूक नियंत्रण करण्याबरोबर बेशिस्‍त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नवीन अत्याधुनिक यंत्रणा उभारण्‍यात आली आहे.

मात्र, याबाबत नागरिकांमध्‍ये जागृती करूनच ही प्रणाली सुरू करण्यात येईल, अशी माहिती वाहतूकमंत्र्यांनी दिली आहे.

सरकारच्यावतीने प्रारंभी पणजीनजीक मेरशी जंक्शनवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण प्रणाली सुरू करण्‍यात आली आहे. त्‍यात रात्रंदिवस चालणारे अत्याधुनिक कॅमेरे आहेत.

त्या आधारे ये-जा करणाऱ्या वाहनांचे क्रमांक मिळवून यासंबंधीची सविस्तर माहिती मिळवण्यात येते. वाहनधारकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांना ई-चलनाद्वारे दंड आकारण्‍यात येणार आहे.

दोन आठवड्यांत स्टॅण्ड

मोपा विमानतळावर पेडणेतील टॅक्‍सी व्‍यावसायिकांसाठी खास ‘ब्‍ल्‍यू कॅब टॅक्‍सी’ सुरू करण्‍याचा निर्णय राज्‍य सरकारने आधीच घेतला आहे.

त्‍यासाठी आवश्‍‍यक स्टॅण्डसाठी कायदेशीर बाबींची पूर्तता होणे बाकी आहे. ती दोन आठवड्यांत मार्गी लागेल, असे आश्‍‍वासन मुख्‍यमंत्र्यांकडून देण्‍यात आले आहे.

टॅक्सी संघटनांचे आंदोलन तू्र्त मागे

मंत्री माविन गुदिन्हो यांनी दोन आठवड्याच्या आत मोपा विमानतळावर टॅक्सी स्टॅण्ड देण्याचे आश्वासन दिल्यानंतर दोन्ही संघटनांनी आपले आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले.

मात्र, दिलेल्या मुदतीत मागण्या मान्य न झाल्यास परत आम्ही आंदोलन सुरू करू, असा इशाराही यावेळी आंदोलकांचे नेते भास्कर नारुलकर यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs South Africa: 5 सामन्यांत 2 शतके, 1 द्विशतक...! श्रेयस अय्यरची जागा घेणार विराटचा पठ्ठ्या? दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत पाडणार छाप

Hurricane Melissa Video: 'हरीकेन हंटर्स'ची धाडसी मोहीम! मेलिसा चक्रीवादळाच्या केंद्रातून केले जीवघेणे उड्डाण; पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

IRCTC Goa Tour Package: बजेटमध्ये गोवा टूर! आयआरसीटीसी घेऊन आलंय जबरदस्त पॅकेज; 3 रात्री 4 दिवसांच्या सैरसाठी लगेच बुकिंग करा

Montha Cyclone Latest Update: 'मोन्था' चक्रीवादळानं धारण केलं रौद्र रुप, आंध्रच्या किनाऱ्यावर धडकणार, ताशी 110 किमी वेगाने वाहणार वारे; रेड अलर्ट जारी

Goa Tourism: सुट्टीसाठी गोव्यात जाताय? बसेल हजारोंचा दंड, गाडी चालवताना 'हे' नियम हवे तोंडपाठ

SCROLL FOR NEXT