New Zuari Bridge Dainik Gomantak
गोवा

New Zuari Bridge: नवे वर्ष, नवा पूल अन् पहिला अपघात, झुआरीवर कार धडकली

उत्तर आणि दक्षिण गोव्याला जोडणारा नाव झुआरी पुल 30 डिसेंबर रोजी खुला करण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

नववर्षाच्या तोंडावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता उत्तर आणि दक्षिण गोव्याला जोडणारा नाव झुआरी पुल 30 डिसेंबर रोजी खुला करण्यात आला. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 29 डिसेंबर रोजी उद्धाटन झाले. वाहतूक कोंडीची समस्या सुटावी म्हणून उभारण्यात आलेल्या नव्या झुआरी पुलावरील पहिल्या वहिल्या अपघाताची नोंद झाली आहे. हा अपघात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी झाला आहे.

(First Accident reported at New Zuari Bridge on the first day of new year)

मिळालेल्या माहितीनुसार, तीन प्रवासी असलेल्या कारचा झुआरी पुलावरून जात असताना नव्या वर्षाच्या पहिल्याच (रविवारी) अपघात झाला. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार वळण घेऊन पुलाच्या संरक्षक कठड्याला धडकली. अपघातात तिन्ही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. उपाचारासाठी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात कारच्या समोरच्या बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, नवा झुआरी पुल वाहतुकीसाठी खुला करून अवघे दोनच दिवस झाले असताना पहिलाच अपघात झाल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

New Zuari Bridge

दरम्यान, 2,530 कोटी खर्च करून भव्य झुआरी पुल उभारण्यात आला आहे. याशिवाय  गोव्यात वाहतुकीचं जाळं पसरवण्यासाठी केंद्राचे प्रयत्न सुरुच आहेत. पत्रादेवी-पाळोळे या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून पत्रादेवी-दोडामार्ग-केरी-मोले-पाळोळे अशा बायपासला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT