Bethora Firing Dainik Gomantak
गोवा

Bethora Firing: बेतोड्यात पहाटे दुचाकी चालकावर गोळीबार, चालक जखमी

Bethora Firing: गोळीबारानंतर अज्ञात व्यक्ती घटनास्थळावरुन फरार झाला.

Pramod Yadav

Bethora, Goa Firing

बेतोड्यात पहाटे गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. दुचाकीवरुन निघालेल्या एकावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला असून, दुचाकी चालक जखमी झाला आहे. शुक्रवारी (दि.०८) पहाटे सहाच्या सुमारास ही घटना घडली.

गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकले नसून, दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनिता सावंत घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

सचिन कुर्टीकर असे गोळीबारात जखमी झालेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी चालक सचिन उसगाव येथून बोरीच्या दिशेने जात होता. यावेळी अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर गोळी झाडली. गोळीबारानंतर अज्ञात व्यक्ती घटनास्थळावरुन फरार झाला. जखमी सचिनला उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT