Firing in Mapusa Goa Dainik Gomantak
गोवा

म्हापसा गोळीबारप्रकरणी तिघांना जामीन मंजूर

जीएमएफसी कोर्टाने प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर दिला सशर्त जामीन

दैनिक गोमन्तक

म्हापसा : येथील कथित गोळीबार प्रकरणात अटक केलेल्या तीन संशयित आरोपींना म्हापसा जीएमएफसी कोर्टाने प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला. तर, बस्तोडा उड्डाणपुलावर एका प्रवाशाला अटकाव करीत दहशत माजवल्याप्रकरणी न्यायालयाने या तिघांना जामीन मंजूर केला होता.

माहितीनुसार, गुरुवारी (2 जून) पहाटे म्हापसा येथे हवेत गोळीबार केल्याप्रकरणी धुळेर येथील एका व्यक्तीस मद्यधुंद अवस्थेत अटक केली होती. त्यापूर्वी बस्तोडा येथील उड्डाणपुलावर एका प्रवाशाकडे दहशत माजवणार्‍या त्याच्या दोन साथीदारांनाही म्हापसा पोलिसांनी अटक केली होती.

ज्यात संशयित जेम्स सौझा, विनायक सोमजी व विल्यम रॉड्रिग्स या तिघांविरुद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. पोलिसांनी भादंसंच्या कलम 341, 324, 170, 506(2) व 34 अन्वये आणि भादंसंच्या कलम 336 व शस्त्र कायदा कलम 25, 27 व 30 नुसार आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवले होते.

शहरात सार्वजनिक ठिकाणी गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तीन संशयितांना म्हापसा जीएमएफसीने 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. त्यानंतर, पहिल्या प्रवासी प्रकरणात जामीन अर्ज दाखल करण्यात आला आणि प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या जामीनाच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन शनिवारी मंजूर करण्यात आला. तर, शस्त्रास्त्र कायद्याप्रकरणी जामीन अर्जावर सुनावणी होऊन मंगळवारी संबंधितांना जामीन मंजूर करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Final: आरसीबीने रचला इतिहास! गुजरातचा धुव्वा उडवत दुसऱ्यांदा कोरलं 'आयपीएल' ट्रॉफीवर नाव, किंग कोहलीचा 'विराट' शो!

गोव्याकडे येणारी बस अंकोल्यात उलटली; एकाचा मृत्यू, 20 प्रवासी गंभीर जखमी; चालकाचे सुटले नियंत्रण

Stray Cattles: डिचोलीतील चौपदरी बगलमार्गावर मोकाट गुरांचा उपद्रव कायम, अपघातांचा धोका; दोन वर्षांत 15 गुरांचे बळी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ अव्वल दहातून बाहेर! 3 महिन्यांत 3.21 लाख प्रवासी कमी; विमान वाहतुकीत मंदीचे संकेत

वीरेश बोरकर यांची वाढती लोकप्रियता मनोज परब यांना खुपली? 'रिव्होल्युशनरी गोवन्स' पक्षाच्या चिंधड्या उडण्यामागचं खरं कारण काय?

SCROLL FOR NEXT