Firing in Curchorem | Goa Crime  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : कुडचडेत वाळू माफियाराज; मजुराचा गोळ्या झाडून खून; पाच अटकेत

स्थानिक संतप्त; अवैध रेती उत्खननासाठी जाताना हल्ला

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime : भाजप नेत्या सोनाली फोगट खून प्रकरणामुळे सध्या राष्ट्रीय स्तरावर चर्चेत असलेला गोवा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणाला बाणसाय कुडचडे येथे बेकायदेशीर रेती व्यवसायातील माफियागिरीची किनार आहे. वाळू माफियांच्या गोळीबारात परप्रांतिय कामगाराचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मृत कामगाराचे नाव युसुफ आलम (23, राहणार झारखंड) असे असून या हल्ल्यात महमद साहू (33) हा कामगार गंभीर जखमी झाला. त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. तर एक जण हल्ल्यातून बचावला.

पोलिस अधिक्षक सॅमी तावारीस यांनी सांगितले, की बुधवारी मध्यरात्री दीड वाजता बाणसाय कुडचडे येथे झुवारी नदीच्या फाट्यात बेकायदेशीररित्या रेती काढण्यासाठी तीन कामगार बोट घेऊन जात होते. नदीपात्रातून जात असताना अज्ञातांनी अंधाराचा फायदा घेऊन नदीच्या काठावर राहून अगदी जवळून बंदुकीच्या गोळ्या झाडल्याने युसूफ आलमचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेमुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून अवैध रेती उत्खननावर बंदी घालण्याची मागणी होत आहे.

या खून प्रकरणानंतर आता बेकायदा रेती उत्खनन व्यवसायाचा मुद्दा चव्हाट्यावर आला असून पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. विजय आदेल, अमेय आदेल, योगेश आदेल, रामदास नाईक व विवेक नाईक अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्या मालकीच्या होडीने हे बेकायेशीर उत्खनन चालू होते. संशयितांच्याच होडीवर कामगाराचा खून झाला आहे.

वेगाने तपास सुरू

पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिस आपल्या कामाला लागले असून घटनास्थळी पोलिस अधीक्षक सेमी तावारीस, पोलीस उपअधीक्षक शुभेन्दू भूषण, उपअधीक्षक नीलेश राणे, पोलिस निरीक्षक वैभव नाईक उपस्थित होते. ही घटना नेमकी कशी व का घडली याचा तपास लावण्यासाठी फॉरेन्सिक टीम व श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते.

यापूर्वीही झाला होता गोळीबार

रेती उपसणाऱ्या कामगारांवर याच जागेवर नऊ महिन्यांपूर्वी असाच हल्ला झाला होता. या हल्ल्यात एका कामगाराच्या पाठीवर गोळ्या लागल्या होत्या. पण, त्यावेळी होडीवर असलेली बॅटरीचा स्फोट होऊन त्यात सदर कामगार जखमी झाल्याचे सांगून सदर हल्ला लपविण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली असती तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती अशी कुजबुज घटनास्थळी सुरू होती.

वाटचाल बिहारच्या दिशेने

कुडचडेची वाटचाल बिहारच्या दिशेने होत असल्याची टीका गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली. पर्यावरण मंत्री नीलेश काब्राल यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले, ‘काब्राल यांच्याच मतदारसंघात अवैध वाळू उत्खननातून गोळीबार होण्याची घटना चिंतेची बाब आहे.’ तर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे अशी टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT