Fire in Mapusa Dainik Gomantak
गोवा

म्हापशात घरांना भीषण आग, लाखोंचं सामान जळून खाक

अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला, परिसरात घबराट

दैनिक गोमन्तक

पणजी : म्हापसा येथील दत्तवाडी परिसरात एका घराला आग लागल्याने मंगळवारी सकाळी खळबळ उडाली. या भीषण अग्नितांडवात चार कुटुंबीयाचे सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशामक दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

म्हापसा दत्तवाडीतील घरांना सोमवारी रात्री अचानक आग (Fire) लागली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरीही आगीत घरांचं मोठं नुकसान झालं आहे. या आगीत दत्तवाडी परिसरातील 4 कुटुंबीयांचं मोठं नुकसान झालं असून सुमारे 5 लाखांचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे. आग लागल्याची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाचे (Fire Brigade) जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी प्रयत्नांची शर्थ करत आगीवर नियंत्रण मिळवलं. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्यान गोव्यात सध्या आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुरगाव सडा येथील विद्याधर रामा नागवेकर यांच्या घराला मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. तर फोंड्यातही (Ponda) दुर्भाट परिसरात घराला आग लागून लाखोंचं नुकसान झालं आहे. मागच्याच महिन्यात पेडण्यातील एका घराला आग लागून सुमारे तीन लाखांचं नुकसान झालं होतं. डिचोली बाजारातील दुकानाला 30 मार्च रोजी आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धावपळ करून आग नियंत्रणात आणल्याने बाजूची अन्य दुकाने सुरक्षित राहिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT