Mapusa ITI Fire Safety Course Dainik Gomantak
गोवा

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Fire Safety Training In Goa: औषधनिर्मिती उद्योग, हॉटेले, रुग्णालये, व्यापारी संकुले, तेल व वायू उद्योग, बांधकाम क्षेत्र तसेच सुरक्षा सल्लागार संस्थांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: राज्यातील वाढते शहरीकरण, उद्योगधंदे, मोठ्या इमारती आणि विविध व्यावसायिक प्रकल्पांमुळे अग्निसुरक्षा व आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज वाढत आहे. ही गरज लक्षात घेऊन म्हापसा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) ‘अग्नितंत्रज्ञान व औद्योगिक सुरक्षा व्यवस्थापन’ हा एक वर्षाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

शासनाच्या अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागाच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे. कौशल्य विकास संचालक विनायक कांबळी यांनी सांगितले की, या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना केवळ वर्गातील शिक्षणावर भर न देता अग्निशमन केंद्रात तीन ते पाच महिन्यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

त्यामुळे आग विझविणे, बचावकार्य, आपत्तीच्या वेळी नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे, अग्निशमन वाहने व उपकरणे हाताळणे, तसेच विविध आपत्कालीन परिस्थितींचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अभ्यासक्रमात अग्नीचे विज्ञान, आग प्रतिबंधक उपाय, औद्योगिक सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार, धोक्यांची ओळख, जोखीम मूल्यांकन, सुरक्षा नियोजन, धोकादायक रसायनांची सुरक्षित हाताळणी, वैयक्तिक सुरक्षा साधनांचा योग्य वापर आणि अग्निसुरक्षेचे नियम यांचा समावेश आहे.

तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणादरम्यान आग विझविणे, रस्ते अपघातातील बचावकार्य, पूरस्थितीतील मदतकार्य, आधुनिक अग्निशमन साधनांचा वापर, अग्निशमन केंद्रातील दैनंदिन कामकाज आणि आपत्कालीन परिस्थितीत संघभावनेने काम करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या अभ्यासक्रमामुळे अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभाग, विमानतळ, संरक्षण आस्थापना, सरकारी उद्योग, औद्योगिक प्रकल्प

औषधनिर्मिती उद्योग, हॉटेले, रुग्णालये, व्यापारी संकुले, तेल व वायू उद्योग, बांधकाम क्षेत्र तसेच सुरक्षा सल्लागार संस्थांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.या अभ्यासक्रमासाठी एकूण २४ जागा उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराची उंची किमान १६५ सेंटीमीटर, वजन ५२ किलो आणि छातीचे माप ८१ ते ८५ सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. तसेच नोंदणीकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे शारीरिक तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

अभ्यासक्रमाची ठळक वैशिष्ट्ये

अभ्यासक्रम : अग्नितंत्रज्ञान व औद्योगिक सुरक्षा व्यवस्थापन

कालावधी : एक वर्ष

प्रत्यक्ष प्रशिक्षण : अग्निशमन केंद्रात तीन ते पाच महिने

एकूण जागा : २४

पात्रता : दहावी उत्तीर्ण

किमान उंची : १६५ सेंटीमीटर

किमान वजन : ५२ किलो

छातीचे माप : ८१ ते ८५ सेंटीमीटर

वैद्यकीय अट : शारीरिक तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र आवश्यक

रोजगाराच्या संधी : अग्निशमन सेवा, औद्योगिक सुरक्षा, विमानतळ, संरक्षण आस्थापना, उद्योग, रुग्णालये, हॉटेले या स्वतःचा व्यवसाय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT