Fire in Goa  Dainik Gomantak
गोवा

Fire in Goa: लोकवस्तीजवळच अग्नितांडव; बागायतदारांचे नुकसान

कारापुरात काजूची झाडे जळाली

दैनिक गोमन्तक डिजिटल

Fire in Goa: तालुक्यात माळरान आणि काजू बागायतींना आग लागण्याचे प्रकार सुरूच आहेत. मंगळवारी (ता. 7) भर दुपारी कारापूर येथे लोकवस्तीजवळ माळरानाला आग लागण्याची घटना घडली. या आगीत काजू बागायती जळून खाक झाल्या. त्यामुळे काजू बागायतदारांचे लाखोंचे नुकसान झाले.

ऐन काजू हंगामात ही आपत्ती कोसळल्याने बागायतदार हतबल झाले आहेत. कारापूर येथील ज्ञानज्योती हायस्कूलपासून काही अंतरावर कुडपवाड्याच्या बाजूने दुपारी आग लागली.

कडक उन्हाची दुपारची वेळ आणि जोरदार वाऱ्यामुळे आगीने वेगाने पेट घेतला. त्यामुळे लोक हवालदिल झाले. डिचोली अग्निशमन दलाला माहिती देताच, शैलेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लिडींग फायर फायटर आर. आर. परब यांच्या नेतृत्वाखाली दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

दुपारी रखरखत्या उन्हात भडकलेली आग नियंत्रणात आणताना अग्निशमन दलाच्या जवानांना कसरत करावी लागली. दुपारी हाती घेतलेले मदतकार्य सायंकाळपर्यंत सुरू होते. मात्र, सायंकाळपर्यंत कारापुरात आग धुमसत होती.

हायस्कूल इमारत सुरक्षित

कारापुरात क्षणार्धात आग सर्वत्र पसरली. गवंडीवाडा येथील ज्ञानज्योती हायस्कूलच्या इमारतीजवळ आग पोहोचली होती. हायस्कूलच्या मागच्या बाजूने आगीने जोर धरला होता. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण आणल्याने हायस्कूलची इमारत सुरक्षित राहिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Silver Rate: इतिहासात पहिल्यांदाच! 10 ग्रॅम सोन्याचा दर 1.38 लाखांच्या पार, तर चांदी सव्वा दोन लाखांवर; आजवरचे मोडले सगळे रेकॉर्ड्स

Virat Kohli Record: कोहलीचा धमाका! सचिन तेंडुलकरचा मोठा रेकॉर्ड मोडीत काढत रचला इतिहास; 16 हजारी क्लबमध्ये दिमाखदार एन्ट्री Watch Video

Bengaluru Crime: बंगळुरुमध्ये माणुसकीला काळिमा! इन्स्टाग्रामवर मैत्री, नंतर प्रेमासाठी दबाव अन् भररस्त्यात तरुणीवर हल्ला; CCTV मुळे नराधम गजाआड

Ishan Kishan Fastest Century: ईशान किशनचा 'विराट' अवतार! 33 चेंडूंत ठोकलं शतक; टीम इंडियात पुनरागमन करताच रचला इतिहास VIDEO

Goa ZP Election Results: "एकत्र आल्याशिवाय भाजपला हरवणं अशक्य", आपची 'निराशाजनक' हार; पालेकरांनी मांडले विश्लेषण

SCROLL FOR NEXT